आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: या गावात राहिले होते महात्‍मा गांधी, पाहा त्‍यांची बैठक आणि टेलीफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरील चित्रात महात्‍मा गांधी यांची बैठक आणि टेलिफोन. खालील चित्रात वेस्टर्न टॉयलेट आणि आटाचक्की. - Divya Marathi
वरील चित्रात महात्‍मा गांधी यांची बैठक आणि टेलिफोन. खालील चित्रात वेस्टर्न टॉयलेट आणि आटाचक्की.
वर्धा/नागपुर- सेवाग्राम आश्रम आणि महात्‍मा गांधी यांच्‍यात कित्‍येक वर्षांचे नाते होते. सेवाग्राममधील 'बापू कुटी'मध्‍ये असलेल्‍या गांधींच्‍या विविध वस्‍तूंच्‍या रुपात त्‍यांच्‍या अनेक आठवणी येथे जशाच्‍या तशा कायम आहेत. 30 जानेवारी 1948 ला महात्‍मा गांधी यांची हत्‍या झाली नसती तर, ते वर्धेत आले असते. कारण त्‍यांचे रेल्‍वे तिकीटही बूक होते. 30 एप्रिलला सेवाग्रामला आले गांधीजी....
- 1934 मध्‍ये जमनालाल बजाज आणि इतर सहका-यांसोबत गांधी वर्धेत आले.
- सुरूवातील ते मगनवाडी परिसरात राहू लागले.
- 30 एप्रिल 1936 ला महात्‍मा गांधी पहिल्‍यांदा मगनवाडीहून सेवाग्रामला रहायला आले.
- सेवाग्रामला आल्‍यानंतर त्‍यांनी पहिल्‍याच दिवशी एक थोडक्‍यात भाषणही दिले होते.
- आता आपण येथेच स्‍थाईक होणार असल्‍याचे त्‍यांनी गावक-यांना सांगितले होते.
- सेवाग्रामचा परिसर सुमारे 300 एकर भागात पसरलेला आहे.
- आश्रमात काही लहानमोठ्या झोपड्या आहेत. बापू आणि त्‍यांचे सहकारी येथे राहत असत.
- स्‍वयंपाकघर, ऑफिस, बैठक असा विविध सोयी सेवाग्राममध्‍ये होत्‍या.
एका संकल्‍पामुळे गांधी वर्धेत आले होते....
- महात्मा गांधी एका संकल्‍पामुळे वर्धेत राहायला आले होते.
- 1930 मध्‍ये साबरमती आश्रमातून दांडी यात्रेवर निघालेल्‍या गांधींनी असा संकल्‍प केला होता की, ते या आश्रमात तेव्‍हाच परततील जेव्‍हा इंग्रजांच्‍या पारतंत्र्यातून देशाला सोडवतील.
- दरम्‍यान तीन वर्षांपर्यंत ते काही आंदोलनांमध्‍ये व्‍यस्‍त होते.
- जमनालाल बजाज यांच्‍या आग्रहाखातर बापू वर्धेत राहायला आले होते.
लोकांना आश्रमात फेरबदल नको....
- आश्रमाशी जुळलेल्‍या काही लोकांना गांधीच्‍या वस्‍तूंमध्‍ये फेरबदल करणे मान्‍य नाही.
- या आश्रमाशिवाय वर्धेत अशी 26 ठिकाणे आहेत, ज्‍यांचा गांधींशी संबंध होता.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, वर्धेच्‍या या आश्रमातील महात्‍मा गांधींशी संबंधित वस्‍तूंचे फोटो...