आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ दरोडेखोरांविरुद्ध पहिल्यांदाच "मोक्का'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- परतवाडाठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यांपूर्वी एकाच दिवशी दोन ठिकाणी दरोडा पडला होता. या प्रकरणातील सहा दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुलडाणा जिल्ह्यातील लोणी लव्हाळा गावातून अटक केली होती. या दरोडेखोरांनी यापूर्वी राज्यात अनेक ठिकाणी गंभीर गुन्हे केल्याची माहिती होती, मात्र ते प्रत्येक ठिकाणी नाव बदलवत असल्यामुळे पोलिसांना त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे फिंगर प्रिंटच्या मदतीने ग्रामीण पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध पुरावे एकत्र करून ग्रामीण पोलिस दलाच्या इतिहासातील पहिला "मोक्का' लावला, अशी माहिती एका पत्रकार परिषदेत मंगळवारी (दि. १९) देण्यात आली.
दहीमन बालाजी भोसले (३६), राजेंद्र बालाजी भोसले (३०), चुब्बा बालाजी भोसले (२१), कफूर बालाजी भोसले (२८), सखाराम बालाजी भोसले (१९, सर्व रा. लोणी लव्हाळा, ता. मेहकर, जि. बुलडाणा) आणि मंजा संतोष पवार (३०, रा. भानखेड, चिखली) या सहा दरोडेखोरांना ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने परतवाडा येथील दरोड्याच्या प्रकरणात १६ नोव्हेंबर २०१५ ला बुलडाणा जिल्ह्यातील लोणी लव्हाळा येथून अटक केली होती. या टोळीमध्ये आणखी सहा जणांचा समावेश होता, मात्र ते अद्याप पोलिसांना मिळाले नाही. परतवाड्याला संजय अतकरे यांच्या घरी नोव्हेंबरच्या मध्यरात्री अकरा ते बारा दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. त्या वेळी दरोडेखोरांनी लाख ९५ हजारांची रोख लाख ७७ हजारांचे दागिने, असा एकूण लाख ७२ हजारांचा ऐवज लंपास केला होता. तसेच परतवाड्याला लागून असलेल्या गौरखेडा शिवारात सुनील नेमाडे यांच्या शेतातील रखवालदार चिरोजी भिलू कोगे यांना मारहाण करून त्यांच्याकडील पाच हजार रुपये दोन मोबाइल लंपास केले होते. या दरोडेखोरांचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांना पकडले.
तपासादरम्यान पोलिस कोठडीमध्ये अन्नत्याग करून पोलिसांना सहकार्य करायचे नाही, असा त्यांचा नवा फंडा होता. त्यामुळे तपास कसा करायचा, असा प्रश्न पोलिसांपुढे उभा होता. या दरोडेखोरांच्या टोळीने यापूर्वी महाराष्ट्रात इतरही ठिकाणी गुन्हे केल्याचे पोलिसांच्या
तपासात पुढे आले होते, मात्र त्यांच्याबाबत कुठेही माहिती मिळत नव्हती. हे दरोडेखोर प्रत्येक ठिकाणी स्वत:चे खरे नाव सांगता नाव बदलवत असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. त्यामुळेच ग्रामीण पोलिसांनी त्यांचे हाताचे ठसे घेतले. हे ठसे राज्यातील मुख्य फिंगर प्रिंट युनिटकडे पाठवले. पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि मुंबई या ठिकाणी फिंगर प्रिंट युनिट आहेत. यातही पुण्यात संपूर्ण राज्यातील गुन्हेगारांच्या फिंगर प्रिंटची माहिती उपलब्ध आहे. त्याच ठिकाणाहून या दरोडेखोरांविरुद्धचे गुन्हे मिळाले. याच टोळीने औरंगाबाद जिल्ह्यातील सोमगाव, फुलंब्री तसेच हिंगोली शहर आणि चिखली या ठाण्यांमध्ये दरोडा, दरोड्यासाठी खून करणे, जबरी चोरी, वाटमारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याआधारेच पोलिस अधीक्षक लख्मी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली परतवाड्याचे ठाणेदार किरण वानखडे यांनी या सहा दरोडेखोरांविरुद्ध मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला विशेष पोलिस महानिरीक्षकांनी मान्यता दिल्यामुळे त्या टोळीविरुद्ध मोक्का कायद्याचे कलम ३(१)(२)३(४) अन्वये दाखल केला आहे. दरोडेखोर नाव बदलवत असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध नावाने गुन्हे मिळाले नाही, अशा वेळी फिंगर प्रिंटच्या माध्यमाने गुन्हेगार ओळखून त्यांच्याविरुद्ध मोक्का लावणे ही महाराष्ट्रातील अलीकडच्या काळातील तसेच ग्रामीण पोलिस दलाच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे, अशी माहिती दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड, पोलिस निरीक्षक सुधीर हिर्डेकर आणि परतवाड्याचे ठाणेदार किरण वानखडे यांनी दिली .
फिंगर प्रिंटमुळेच दरोडेखोरांविरुद्ध लागला "मोक्का'
परतवाड्याच्यादरोड्यानंतरस्थानिक गुन्हे शाखेने सहा दरोडेखोरांना पकडले. त्यांच्याविरुद्ध राज्यात इतर ठिकाणीसुद्धा गुन्हे दाखल होते, मात्र ते नाव बदलवत असल्यामुळे मोक्का लावण्यासाठी आवश्यक असलेले गुन्हे शोधण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे फिंगर प्रिंटच्या आधारे त्यांच्याविरुद्ध गुन्हे शोधले मोक्का लावला आहे. अमरावती ग्रामीण पोलिस दलातील ही पहिलीच "मोक्का' कारवाई आहे. लखमी गौतम, पोलिसअधीक्षक, अमरावती.