आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ: सव्वादोन लाख शेतकऱ्यांनी केले ऑनलाइन अर्ज दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - जिल्ह्यातील सव्वादोन लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आज, दि. १५ सप्टेंबर रोजी ऑनलाइन अर्ज दाखल केले. आता ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. आता दि. २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारल्या जाणार आहे. 
 
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २००९ ते २०१७ अंतर्गत कर्जमाफी, प्रोत्साहनपर इतर लाभ मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आज, दि. १५ सप्टेंबर रोजीपर्यंतच मुदत देण्यात आली होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील लाख १३ हजार थकीत कर्जदार आणि उर्वरीत ५२ हजार १६३, असे मिळून लाख ६६ हजार १६१ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहे. ह्या शेतकऱ्यांना दीड लाख रूपयापर्यंतचे कर्जमाफ करण्यात येणार आहे. दरम्यान, आपले सरकार पोर्टल केंद्र, सीएससी सेंटर या ठिकाणाहून अर्ज भरण्याची सुविधा दिली. तर बऱ्याचवेळा सर्व्हरडाऊन असल्यामुळे जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. अशा अडचणींना तोंड देत शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले. आज, दि. १५ सप्टेंबर रोजी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, ऑनलाइन अर्ज दाखल करताना शेतकऱ्यांना आलेल्या अडचणीमुळे ह्याची मुदतवाढ देण्यात आली असून, आता २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...