आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या दुचाकीवरून पडल्याने आईचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- भातकुलीवरून अमरावतीला येताना मुलाच्या दुचाकीवरून पडल्याने ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी २१ जुलैला घडली आहे. गिरजा बबनराव धनवाडे (६०, रा. इंदिरानगर, भातकुली) असे मृतक महिलेचे नाव आहे. गिरजा धनवाडे शुक्रवारी मुलगा गणेश यांच्या दुचाकीवर बसून भातकुलीवरून अमरावतीकडे येत होत्या. मार्गातील पांढरी येथील पेट्रोल पंपांजवळ गिरजाबाईंचा दुचाकीवरून तोल गेला त्या कोसळल्या. त्यांना इर्विनमध्ये दाखल केले आहे. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती बडनेरा पोलिसांनी दिली. 
 
बातम्या आणखी आहेत...