आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तान्हुलीला सोडून मातेने केले पलायन, परतवाड्याच्या सदर बाजार परिसरातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: मातेच्या प्रतीक्षेत चिमुकली.
परतवाडा - महिनाभरा पूर्वी अचलपूर तालुक्यात मुलीला (निशाणी)जिवंत जाळल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी (दि. १३) एका मातेने आपल्या तीन महिन्यांच्या मुलीला एका अनोळखी महिलेजवळ सोडून पळ काढल्याची घटना सदर बाजार परिसरात उघडकीस आली आहे. पोलिसांनी मातेला शोधूनही ती सापडल्याने सायंकाळी उशीरा मुलीची अमरावती येथील शिशुगृहात रवानगी केली.

पेंशनपुरा परिसरात राहणाऱ्या कुसुम गहलोत (५५) यांचा सदर बाजार परिसरात मंगळसूत्र गाठून देण्याचा व्यवसाय आहे. बुधवारी दुपारी बाराच्या दरम्यान त्यांच्या दुकानात हातात पॉलिथिन पिशवी, त्यामध्ये मुलीचे कपडे कडेवर मुलगी घेऊन लाल साडी घातलेली एक महिला आली. ितने बनावट दागिन्यांचे मंगळसूत्र गहलोत यांच्याकडून गाढून घेतले. त्या वेळी या महिलेसोबत चिमुकली व्यतिरिक्त कुणीही नसल्याचे गहलोत यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान महिलेने आपल्या तीन महिन्यांच्या तान्हुलीला गहलोत यांच्याकडे सोपवून पाच मिनिटांत पतीला घेऊन येते, तोपर्यंत मुलीकडे लक्ष ठेवा, असे सांगून निघून गेली, परंतु तीन वाजूनही ती महिला परत आल्याने गहलोत यांनी आजूबाजूच्या दुकानदारांना माहिती दिली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. वाऱ्यासारखी बातमी शहरात पसरली. बघ्यांची गर्दी जमू लागली. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या घटनेबाबत परिसरामध्ये अनेक तर्कवितर्कांना उधाण आले. पुढील तपास ठाणेदार किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.