आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोंडावरील 'मास्क'चा झाला स्फोट; अमरावती 'सुपर स्पेशालिटी'तील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो. - Divya Marathi
फाइल फोटो.
अमरावती - आयसीयूत उपचार सुरू असलेल्या एका ७० वर्षीय वृद्धाच्या तोंडावर लावलेल्या ऑिक्सजन मास्कचा अचानक स्फोट झाला. यात त्यांचे तोंड भाजले. अमरावतीच्या विभागीय सुपर स्पेशालिटी रुग्णालयात शुक्रवारी ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी रुग्णालयात येऊन नेमका स्फोट कशामुळे झाला याचा तपास सुरू केला आहे.

दोन्ही यकृते निकामी झाल्याने वृद्ध या ठिकाणी डायलिसिस घेण्यासाठी आले होते. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना आयसीयूत ठेवण्यात आले. कृत्रिम श्वासोच्छ‌्वासासाठी तोंडावर लावण्यात आलेल्या ऑक्सिजन मास्कचा अचानक स्फोट झाला. यात त्यांचा चेहरा भाजला व किरकोळ दुखापत झाली. घटना घडली तेव्हा रुग्णाचे नातेवाईक त्याच ठिकाणी झोपले होते. दरम्यान, शनिवारी वृद्धाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
व्हॅसलिनने होऊ शकतो स्फोट
अशा प्रकारची घटना ही पहिल्यांदाच घडली व बघितलीही. पोमेड, व्हॅसलिन, बॉडी लोशन व व्हिक्स व ज्वलंत पदार्थ यामुळे कदाचित हा स्फोट झाला असावा. याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात फलक लावण्यात आले आहेत.
- डॉ. श्यामसुंदर निकम, वैद्यकीय अधीक्षक, सुपर स्पेशालिटी.