आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहावे वेतन; थकित रकमेसाठी मनपात कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सहाव्या वेतन आयोगाच्या थकीत रकमेला घेऊन महापालिकेत पुन्हा आंदोलन सत्र सुरू होण्याची चिन्हे दिसत आहे. दिवाळी पूर्वी थकबाकीची रक्कम मिळावी म्हणून महापालिका कर्मचारी-कामगार संघाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. सप्टेंबरच्या अंतिम आठवड्यात धरणे आंदोलन देखील केले जाणार आहे. शासन निर्णयानुसार महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना देय असलेली सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी रक्कम देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसाेबत प्रशासनाने चर्चा केली; मात्र मौखिक आश्वासनांखेरीज काहीच मिळाले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. कार्यरत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जानेवारी २००६ ते ३० एप्रिल २०१० पर्यंतची व्या वेतन आयोगाची थकीत रक्कम देण्याची मागणी करण्यात आली आहे. ही थकबाकीची रक्कम देण्यासाठी महापालिकेकडे पैसे नसल्याचे उत्तर दिले जात आहे. शिवाय याबाबत कोणतेही नियोजन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. तत्कालीन आयुक्त अरुण डोंगरे यांच्या कार्यकाळात देखील सहाव्या वेतन आयोग थकबाकीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. उत्पन्नात वाढ झाल्यानंतर थकबाकी देण्याबाबत आम सभेत एकमत झाले होते. मात्र तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कार्यकाळात सहाव्या वेतन आयोग थकबाकीचा मुद्दा मागे पडला होता, आता पुन्हा नव्याने आंदोलन अस्त्र वापरत कर्मचाऱ्यांनी थकबाकी देण्याचा मुद्दा लावून धरला आहे. कर्मचाऱ्यांमध्ये असलेला तीव्र असंतोष लक्षात घेता २९ ३० सप्टेंबरला महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यानंतर देखील थकबाकी देण्यास प्रशासनाने निर्णय घेतल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनासोबत झालेल्या चर्चेला अध्यक्ष रमेश पांडे, कार्याध्यक्ष मानवीराज दंदे, सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल, उपाध्यक्ष कमलाकर जोशी, डी. एल. खडेकार, विद्या बारसे, सविता पाटील, गणेश तंबोले, लखन चंडाले, शिवा डेंडुले, चंद्रसेन सारवान आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...