आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमचे नेते विदर्भाच्या नावावर भोगताहेत सत्ता : खासदार पटाेले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- ‘आमच्याच बड्या नेत्यांनी विदर्भाचे आश्वासन देऊनही ते पाळले नाही. आता ते विदर्भाच्या नावावर सत्तेचे सुख उपभोगत असून शेतकरी आणि विदर्भाच्या प्रश्नावर मात्र पळ काढत अाहेत,’ अशी टीका भाजपचे खासदार नाना पटोले यांनी स्वपक्षीय नेत्यांवर केली. आपण वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात उतरणार असल्याची घोषणादेखील त्यांनी केली आहे.  
 
  
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना  पटोले यांनी नितीन गडकरी यांच्यावर नाव न घेता ताशेरे ओढले. विदर्भ  सक्षम झाल्यानंतरच वेगळ्याराज्याचा विचार करता येईल, असे सांगणाऱ्या नेत्यांना मला सांगायचे आहे की विदर्भ मागासला असल्याचे अनेक कमिट्यांनी जाहीर केले आहे. त्यावर वेगळे राज्य हाच एकमेव उपाय आहे. भाजपने विदर्भाचे राज्य देण्याचे आश्वासन देऊनही ते दिले नाही.  आताही भाजप विदर्भाचे गाजर दाखवण्याचा प्रयत्न करतेय. मी स्वत: संसदेत विदर्भाचा अशासकीय ठराव मांडला होता. मात्र, तो चर्चेलाच येऊ दिला नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे विदर्भाचे राज्य आरामात होऊ शकते. मात्र, भाजपला ते करायचे नाही’, असा आरोपही पटोले यांनी केला.   
बातम्या आणखी आहेत...