आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच : न्यायालय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- ‘अमरावती जिल्ह्यातील अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच अाहे. वडिलाच्या नावावर शेती असलेल्या मुलाला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवता येते,’ असा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निकालामुळे कुलदीप प्रभाकरराव काळबांडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या १५ जून रोजी काळबांडे यानी आर्थिक दुर्बल गटातून अचलपूर कृउबा समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. परंतु कुलदीप काळबांडे यांच्याऐवजी त्यांच्या वडिलांच्या नावाने शेती असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी राजेश भुयार यांनी त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्याविरुद्ध काळबांडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर न्या. अतुल चांदुरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. कुलदीप काळबांडे हे संयुक्त परिवारात राहात असल्यामुळे शेती ही त्यांच्या वडिलांच्या नावाने आहे. त्यामुळे ते शेतकरीच आहेत, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता. याचिकाकर्त्यांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने काळबांडे यांचा अर्ज ग्राह्य धरण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर मंगळवारी अंतिम निकाल दिला.

दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने ४० एकर शेती आणि पतीचे उत्पन्न एक कोटी असलेल्या महिला उमेदवार अश्विनी प्रवीण तायडे यांचा अर्ज आर्थिक दुर्बल घटकातून ग्राह्य धरला. तर सुधीर शेषराव रहाटे यांनी चार दिवसांत दोन वेगवेगळे उत्पन्नाचे दाखले सादर केले असतानाही त्यांचा अर्ज ग्राह्य धरला. या अर्जांना रद्द करावे, अशी विनंती काळबांडे यांनी केली. त्यावर उच्च न्यायालयाने तायडे यांचा अर्ज रद्द ठरवला असून, रहाटे यांच्या प्रकरणात अचलपूर येथील तहसिलदारांना बुधवारी सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे
बातम्या आणखी आहेत...