आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही स्टारच्या प्रेमात वेडा \'आशिक\' पोहोचला कोठडीत, पोलिस म्हणाले- चल तुला तिची भेट घालून देतो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर -  'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमचं असो आमचं सेम असत'
असे कितीही म्हटले तरी प्रेमाचे रंग प्रत्येकाचे वेगळे असतात. त्यातही ते एकतर्फी असेल तर मग बोलायलाच नको. ‘हम आपके दिल मे रहते है’ म्हणत भिडू जिच्यावर प्रेम करतो तिला मात्र याचा पत्ताही नसतो. माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात इंटरनेट, फेसबुक, व्हॉटस् अॅपमुळे प्रेम कोणावरही करता येते. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील मालदुगी येथील स्वप्नील सहारे हा थेट एका टीव्ही अभिनेत्रीच्याच प्रेमात पडला. शेवटी अभिनेत्रीला लग्न न केल्यास आत्महत्येची धमकी देण्यापर्यंत त्याची मजल गेली. अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झालेल्या या आशिकची रवानगी कोठडीत झाली आहे. 
 
फिल्मी आहे प्रेमकहाणी 
स्वप्नील सहारेची ही प्रेमकहाणी सिनेस्टाईल आहे. कुरखेडा येथील एका महाविद्यालयात बी. ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी असलेल्या स्वप्नीलचे मुंबईतील एका युवतीवर प्रेम जडले. युवती त्याच्या गावातील किंवा महाविद्यालयातील नव्हे तर टीव्हीवर गाजलेल्या दोन-तीन मालिकेतील अभिनेत्री आहे. दोन वर्षांपूर्वी स्वप्नीलला ती आवडू लागली. त्याने आपल्या हातावर तिचे नावही गोंदवून घेतले. तिचा मोबाइल क्रमांक मिळवून तिला प्रेमाचे मेसेज पाठवू लागला. काही दिवसांनी व्हॉटस् अॅप सुरु झाल्यावर त्याने त्यावर मेसेज पाठवणे सुरू केले. हळूहळू प्रेमा ऐवजी अश्लील मेसेजेस पाठवू लागला. अनेकदा अश्लीलतेचा कळस गाठणारे मेसेजे पाठविले. पण, असेल कुणीतरी प्रेमवेडा चाहता म्हणून तिने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, एक दिवस ‘मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझ्याशी लग्न केलं नाही तर मी आत्महत्या करेन', असा मेसेज स्वप्निलने पाठवला. मेसेज वाचताच अभिनेत्रीची झोप उडाली. नाहकच आपल्यामागे भानगड लागेल म्हणून तिने कुराड व्हिलेज मालाड पोलिस ठाण्यात तक्रार केली.
 
पोलिस म्हणाले- चल तुला तिची भेट घालून देतो
तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली असता, अभिनेत्रीला अश्लील संदेश पाठविणारा आणि आत्महत्या करण्याची धमकी देणारा युवक कुरखेडा तालुक्यातील मालदुगी येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कुराड व्हिलेज मालाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक खरात हे आपल्या चार सहकारी पोलिसांसह मालदुगी येथे पोहोचले. त्यांनी स्वप्नील सहारेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आपणच अश्लील मेसेज पाठवून धमकी दिल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी कुरखेडा पोलिसांना माहिती देऊन स्वप्नील सहारे याला माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मालाड पोलिस त्याला मुंबईला घेऊन गेले असून, त्याची ‘त्या' अभिनेत्रीशी थेट-भेटही करुन देणार आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...