आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घनकचरा जाळणाऱ्याविरुद्ध फौजदारीचा गुन्हा दाखल; मनपा प्रशासनाची कारवाई, कंत्राटदाराला ठोठावला दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरामध्ये घनकचरा जाळणाऱ्या विरोधात आता फौजदारी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भात पहिला एफआयआर गाडगेनगर पोलिस ठाण्यात दाखल देखील करण्यात आला आहे. शिवाय कंत्राटदारावर देखील दंड ठोठाविण्याची कारवाई करण्यात आली आहे. 

स्थानिक बियाणी चौकात कचरा जाळण्यात आल्याची तक्रार आरोग्य निरीक्षक एस.एस. राजूरकर यांनी गाडगेनगर पोलिस ठाण्यात नोंदविली. त्याअनुषंगाने कचरा जाळल्याच्या प्रकरणात पोलिस ठाण्यात फौजदारी दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रीय हरीत लवादाने स्थानिक स्वराज्य संस्थांना कचरा जाळण्याबाबत कारवाईचे निर्देश दिले आहे. त्या निर्देशानुसार कचरा जाळणाऱ्याला हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावल्या जाऊ शकतो.
 
यात फौजदारी कारवाई करण्याची तरतूद आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ आणि हवा प्रदूषण १९८१ च्या कायद्यान्वये कचरा जाळण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. शहराच्या विविध भागात खुल्या जागेत जमा झालेला कचरा कंपोस्ट डेपोत नेण्याऐवजी जाळला जात असल्याचे वास्तव दिव्य मराठीने अनेकदा उघड केले. दस्तूर नगर, राजापेठ परिसरातील स्टेट बँक कॉलनी, बडनेरा अलमास गेट आदी परिसरात नेहमीच कचरा जाळला जात असल्याने प्रशासनाने उपरोक्त निर्णय घेतला आहे. 

साफसफाई कंत्राटदाराला दंड: महापालिकेच्याझोन क्रमांक अंतर्गत येणाऱ्या बियाणी चौकात कचरा जाळण्याची बाब समोर आल्यानंतर साफसफाई कंत्राटदाराला हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरात सर्वेक्षण होणार असल्याने महापालिका प्रशासनाकडून विविध दक्षता घेतली जात आहे. 
 
फौजदारी कारवाई 
शहराच्या विविध भागात गोळा करण्यात आलेला कचरा खुल्या जागेत साठविला जातो. साठवणूक केलेल्या ठिकाणी कचरा जाळण्याचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. फौजदारी शिवाय कंत्राटदारावर हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे - सोमनाथ शेटे, अतिरिक्त अायुक्त महापालिका, अमरावती.