आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानगरपालिकेला राज्य शासनाची नोटीस, आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी केली होती तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेलाप्राप्त तेराव्या चौदाव्या वित्त आयोग निधीतून करण्यात आलेल्या खर्चाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्याकडून तक्रार करण्यात आल्यानंतर राज्य शासनाने महापालिकेला नोटीस देखील बजावली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकास कामांकरिता केंद्र शासनाच्या वित्त आयोगाकडून निधी प्राप्त होतो. विशिष्ट कामाकरिता प्राप्त झालेला निधी अन्य कामाकरिता वापरता येत नाही. मात्र तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कार्यकाळात तेराव्या चौदाव्या वित्त आयोगातील निधी अन्यत्र वळविण्यात आल्याची बाब समोर आली.

आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्याकडून नगर विकास सचिवांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर शासनाने नोटीस देत १३ १४ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती मागितली आहे. शासनाकडून प्राप्त नोटीस प्रमाणे वित्त आयोग निधी कोणत्या विकास कामांवर खर्च करण्यात आला, या विस्तृत माहिती मनपाला सादर करावी लागणार आहे. माहिती सादर केल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

ही प्रशासकीय चूक
^केंद्रhकडूनविविधविकास कामांकरिता मनपाला तेराव्या चौदाव्या वित्त आयोगाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून विशिष्ठ कामे करणे बंधनकारक असताना अन्यत्र कामे केली. याबाबत सचिवांकडे तक्रार करण्यात आली अाहे. अशा प्रकारे निधी खर्च करणे मोठी प्रशासकीय चूक आहे. डॉ.सुनील देशमुख, आमदार,अमरावती.
बातम्या आणखी आहेत...