आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांवर पोलिसांची नजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आगामी महापालिका निवडणुकीमध्ये लढणाऱ्या उमेदवारांपैकी ज्यांचा यापुर्वी एखाद्या गुन्ह्यात समावेश आहे. अशा उमेदवारांची यादी पोलिस तयार करणार आहे. इतकेच नाही तर त्या उमेदवारांकडून निवडणूक काळात उत्कृष्ठ वर्तन ठेवण्याबाबत ‘बॉन्ड’सुध्दा पोलिस लिहून घेणार आहे. तसेच उमेदवारांसोबत राहणाऱ्या निकटच्या १० ते १५ जणांचीसुध्दा पोलिस यादी तयार करून त्यांच्यावरही नजर ठेवणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शनिवारी (दि. १४) सांगितली आहे. 
 
महापालिकेसाठी निवडणूक लढवण्यास ईच्छूक उमेदवारांपैकी किती उमेदवारांवर घरगुती वादातील गुन्हे वगळता इतर प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत? असल्यास कोणत्या प्रकरणात आहे? याबाबतची सविस्तर माहिती काढून पोलिस त्यांची यादी तयार करणार आहे. तसेच प्रत्येक उमेदवारासोबत राहणाऱ्या निकटचे १० ते १५ व्यक्ती जे असतील, त्यापैकी कोणावर गुन्हे दाखल आहेत का? असल्यास त्यांची स्वतंत्रपणे यादी तयार करण्यात येत आहे. यासोबतच प्रत्येक ठाण्यात तयार असलेली ‘टॉप टेन’ गुन्हेगारांची यादी पाहून पुन्हा एकदा या यादीतील गुन्हेगारांना समज देण्यात येणार आहे. यातील काहींना निवडणुकीपुर्वी दोन वर्षांसाठी शहर जिल्ह्यातून तडीपार करण्यात येणार आहे. तर ज्यांचा अलीकडच्या काळात गुन्हेगारीमध्ये सहभाग नाही अशांना तात्पुरत्या स्वरुपात निवडणूक काळासाठी शहरातून हद्दपार करण्यात येणार आहे. अशा दोन गटात गुन्हेगारांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. 

गुन्हेगारांचीहोणार पेशी : निवडणूकीपुर्वीशहरातील रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची पोलिस आयुक्तांसमोर पेशी होणार आहे. २० ते ३१ जानेवारी दरम्यान या गुन्हेगारांना पोलिस आयुक्तांसमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.