आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपात कर्मचाऱ्यांचे कामबंद; सेवा ठप्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सहाव्या वेतन आयोगातील थकबाकीच्या मागणीला घेऊन महापालिका कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन आरंभले आहे. महापालिकेतील तब्बल १५०० पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचारी संपावर गेल्याने शहरातील मुलभूत सेवा कोलमडली आहे. कार्यालयीन काम बंद करीत मुख्य प्रवेशद्वारावर आज (१४ ऑक्टोबर) घोषणाबाजी केली.
कर्मचारी संपावर गेल्याने महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालय ओस पडले होते. सर्वच विभागातील शंभर टक्के कर्मचारी संपात असल्याने कार्यालयात रिकाम्या खुर्च्या दिसून येत होत्या. शिवाय अनेक विभागाचे तर कुलूप देखील उघडण्यात आले नव्हते. महापालिकेत सहावा वेतन आयोग लागू करण्यात आल्यानंतर जानेवारी २००६ ते ३० एप्रिल २०१० पर्यंतची एकूण ५२ महिन्यांची कर्मचाऱ्यांची थकबाकी अद्याप कायम आहे. आर्थिक स्थिती डबघाईस आल्याने महापालिका प्रशासनाने वेतन आयोगाची थकबाकीची रक्कम देण्यास वेळ काढू धोरण अवलंबले आहे. तर महापालिकेतील विविध संघटनांनी या मागणीला घेऊन प्रशासनासोबत सतत पाठपुरावा केला. त्यानंतर कार्यरत कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या फरकाच्या रक्कमेबाबत विवरण पत्र अदा करण्यात आले. महापालिकेची आर्थिक स्थितीची जाण ठेऊन एकत्रित रक्कम अदा करणे शक्य नसल्याने कर्मचाऱ्यांनी टप्पा-टप्पाने मिळावी म्हणून कालबद्ध धोरण करण्याची मागणी केली. मात्र प्रशासनाला याबाबत देखील अद्याप वेळ मिळाला नसल्याचे कर्मचारी संघाचे म्हणणे आहे. कर्मचारी संघाचा केवळ आश्वासने देण्यात आली. थकबाकीची रक्कम प्रत्येक वर्षी अंदाजपत्रकात तरतूद करुन कर्मचाऱ्यांना गाजर दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. उत्पन्न वाढवा, वसुली वाढवा मगच थकबाकी देणे शक्य होईल.

वर्ग कार्यरत
{अ १४
{ब १५
{क ४६४
{ड १०३५
एकूण १५२८

यापुढे दक्षता घेणार
^कर्मचाऱ्यांचा संपमिटवण्याबाबत तडजोडीची भूमिका प्रशासनाने स्वीकारली आहे. प्रशासनाच्या वतीने अति. आयुक्तांनी कर्मचारी संघटनेसाेबत चर्चा केली. मुलभूत सुविधा प्रभावित होऊ नये म्हणून दक्षता घेतली जाणार आहे. विनायकऔगड, उपायुक्त महापालिका
बातम्या आणखी आहेत...