आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Give Free Training Of Four wheeler Vehicles For Women

महिलांना चारचाकी वाहनांचे महापालिका देतेय मोफत प्रशिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दारिद्र्यरेषेखालील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत (एनयूएलएम)दक्षिण झोन क्र. बडनेरा येथे चारचाकी वाहन चालवण्याचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे.
तीन महिने दररोज चार तास प्रशिक्षण देण्याची जबाबदारी मनपा एनयूएलएम प्रकल्पांतर्गत विद्याभारती औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शबाना परवीन अब्दुल जलील यांच्याकडून प्रेरणा घेत दारिद्र्यरेषेखालील महिलांसाठी अशा पद्धतीचा राज्यातील पहिलाच प्रयाेग मनपा राबवत अाहे. ३० महिला उत्स्फूर्तपणे प्रशिक्षण घेत असून, आणखी काही महिला त्यांची प्रेरणा घेऊन प्रशिक्षण घेण्यास तयार आहेत.

प्रशिक्षणाचे उद‌घाटन मनपाच्या बडनेरा येथील विभागीय कार्यालयात महापौर चरणजीतकौर नंदा यांच्या हस्ते झाले. मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला विभाग बडनेराचे सभापती चंदुमल बिल्दानी, पोलिस निरीक्षक विजय सोळंके, सहायक आयुक्त योगेश पीठे, विद्याभारती औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावतीचे प्राचार्य झंवर, एनयूएलएम प्रकल्प संचालक डी. जी. बागडे उपस्थित होते. संचालन समुदाय संघटक राजू मनवर आभार प्रदर्शन प्रफुल्ल कुकडे यांनी केले. महापौरांनी हिरवी झेंडी दाखवून प्रशिक्षणाचे उद्घाटन केले. महिलांची स्वतंत्र चारचाकी प्रशिक्षण शाखा सुरू करण्यासाठी एनयूएलएम व्यवस्थापक प्रफुल्ल ठाकरे, रेणुका कापुसकर, अनिता कांडलकर, शबाना परवीन, अनुपमा गोंडाणे या कर्मचारी महिलांनी परिश्रम घेतले. ज्या महिलांना चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यांना विभागाचे समुदाय संघटक तसेच व्यवस्थापकांशी संपर्क साधता येईल, असे मनपातर्फे कळवण्यात आले आहे.

तीनमहिने धडे : तीनमहिने मोफत प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना राेजगार मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.

या महिलांचा प्रशिक्षणात आहे सक्रिय सहभाग
शहनाज खान, शिवानी बोरकर, पौर्णिमा भजगवरे, मुमताज जलील, सुप्रिया बोरकर, सविता गायकवाड, अनिता कांडलकर, शबाना परवीन अब्दुल जलील, वर्षा पकडे, विद्या सुने, अरुणा गोंडे, कुंदा लाभाणे, कुंदा मेश्राम, अनुपमा गोंडाणे, मीनाक्षी टेंभुर्णे, अर्चना गोंडाणे, हीना टेंभुर्णे, अर्चना बोबडे, पूर्वजा गणोरकर, ज्योती बांते, रंजना राऊत, प्रियंका लांजेवार, कीर्ती मुळे, किशाेरी लांजेवार, नंदा गुप्ता या महिला चारचाकी चालवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत.