आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिरातून मनपाला ४९.४३ लाखांचे उत्पन्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शासकीयसुटीच्या दिवशी शिबिरांचे आयोजन करीत महापालिका प्रशासनाने तब्बल ४९ लाख ४३ हजार रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. महापालिकेच्या कृष्णानगर, हमालपुरा तसेच बडनेरा झोनच्या वतीने शनिवारी(२२ ऑक्टोबर) रविवारी (२३ अॉक्टोबर) मालमत्ता कर वसुली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महापालिकेच्या झोन क्रमांक बडनेरा अंतर्गत दोन दिवसात सर्वाधिक ३८ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला. तीनही झोन अंतर्गत विविध स्थळावर शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. दैनंदिन कामकाज करताना महापालिका कार्यालयात मालमत्ता कराचा भरणा करण्यास नागरिकांना पुरेसा वेळ मिळत नाही. धकाधकीच्या जीवनात नागरिकांना त्यांच्या घराच्या आसपास मालमत्ता कर भरण्याची सुविधा महापालिका प्रशासनाकडून शिबिरांच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्या जात आहे. दिवाळीच्या पर्वावर शासकीय सुटीच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तिनही झोनमध्ये दोन दिवसात ४९ लाख ४३ हजार ६७८ रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यास प्रशासनाला यश मिळाले. बडनेरा कृष्णानगर झोनमध्ये दोन्ही दिवस शिबिरांचे आयोजन करण्यात आले. कृष्णानगर झोनमध्ये मेघे कॉम्लेक्स, व्हीएमव्ही रोड, समता कॉलनी, अंबा अपार्टमेंट, अर्जुन नगर, गुरूदेव सेवा आश्रम, उत्तर झोन कार्यालय, नागोबा मंदिर शोभा नगर, महेंद्र कॉलनी चौक, साई हॉल रामपुरी कॅम्प, टोपे नगर ठवरे किराणा जवळ शिबिरांचे आयोजन करण्यात आले. बडनेरा झोनमध्ये हरिगंगा ऑइल मिल,गणेश नगर, प्रभादेवी मंगल कार्यालय बायपास रोड, मनभरी फुड्स कंवर नगर, दस्तूर नगर, गजानन महाराज मंदिर स्वस्तिक नगर, साई मंदिर साई नगर चौक, आकोली रोड साईनगर, जयस्तंभ चौक, सिंधी कॅम्प येथे शिबीर घेण्यात आले.

मालमत्ता कर वसुली
झोननाव रक्कम
कृष्णानगर ६,२३,४२६
हमालपुरा ५,१९,२५२
बडनेरा ३८,०१,०००
एकूण ४९,४३,६७८
बातम्या आणखी आहेत...