आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाची अंतिम आमसभा आज, जनसामान्यांच्या प्रश्नांनी सभा गाजण्याचे संकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेच्या विद्यमान सदस्यांची अंतिम आमसभा बुधवार १४ डिसेंबरला आयोजित करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी होणारी अंतिम आमसभा असल्याने सदस्यांकडून उपस्थित जनसामान्यांचे प्रश्नांना घेऊन गाजण्याचे संकेत आहे. शिवाय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प निविदांना घेऊन सभेत घमासान होण्याची शक्यता आहे.
विद्यमान महापालिकेचा कार्यकाळ मार्च २०१७ मध्ये संपुष्टात येत आहे. तत्पूर्वी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका होणे आवश्यक आहे. नगर सचिव विभागाने सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी पूर्ण केल्याची माहिती आहे. प्रभाग रचना, आरक्षण, लोकसंख्या निहाय बुथ, मतदार यादी आदी विविध निवडणुकीचे कार्य नगर रचना विभागाकडून पूर्ण करण्यात असल्याची माहिती आहे. सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता अाहे; त्यामुळे नगरसेवकांना देखील निवडणुकीचे वेध लागले आहे. शहरातील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे व्यासपीठ असल्याने सदस्यांकडून मोठ्या प्रमाणात आमसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. काही सदस्यांच्या प्रभागात विकास कामे रखडली आहे. रखडलेल्या विकास कामांमुळे नगरसेवकांवर जनतेकडून टिकेची झोड उठवली जात आहे. ही बाब लक्षात घेता विकास कामे तातडीने करुन घेण्यासाठी सर्वच पक्षाच्या नगरसेवकांकडून शर्थीचे प्रयत्न केल्या जात आहे. मात्र प्रशासनाकडून अडवणूक होत असल्याने निदर्शनास आल्याने आमसभेत यावर चर्चा घडवून आणण्याचा नगरसेवकांचा प्रयत्न आहे. यामध्ये रस्त्याचे डांबरीकरण, खुल्या मैदानाला फेन्सींग, विविध प्रभागात करण्यात आलेले विकास कामे, तेरावा चौदाव्या वित्त आयोगाकडून प्राप्त निधीतील विकास कामे, शहर बस सेवा, दैनंदिन साफसफाई आदी विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

घनकचराव्यवस्थापन गाजणार: सुकळीडेपो येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आरंभ करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केल्या जात आहे. शहरातून दैनंदिन घनकचरा उचलल्या जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. असे असताना पूर्वीच्या कंत्राटदारास तब्बल सात वर्षांचा पुन्हा कंत्राट देण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापनाचे कोणतेही धोरण नसताना कंत्राट देण्यात आले. स्थायी समितीकडून शिक्कामोर्तब करण्यात आले, मात्र आमसभेत यावर कोणतीच चर्चा करण्यात आली नसल्याने सदस्य आक्रमक होण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...