आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका युतीबाबत चर्चेची गुऱ्हाळं कायम, निर्णय लटकला ‘अधांतरी’ भाजप-सेना नेत्यांची बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीनंतर आता पालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यात यवतमाळ, पुसद, उमरखेड आणि दारव्हा या चार पालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजप-शिवसेनेने युती करायची की, नाही यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक शनिवारी दुपारी विश्रामगृहात झाली. या बैठकीत युतीबाबत सविस्तर चर्चा झाली. मात्र त्यात कुठलाही ठोस निर्णय होऊ शकला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे युतीचा हा मुद्दा अद्यापही अधांतरीच अडकलेला आहे.
जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. त्यात ठिकाणी शिवसेनेने, तर ठिकाणी भाजपने नगराध्यक्षपदी वर्णी लावली आहे. उमरखेड पालिकेत त्यांना नगराध्यक्षपदासह सदस्यांच्या विजयावर समाधानी व्हावे लागले. या पालिकेत शिवसेनेने जागा पटकावल्या आहेत. या पालिकेसंदर्भात झालेल्या चर्चेत स्थानिक आघाडीला सोबत घेऊन एक गट तयार करण्याची जबाबदारी भाजपवर सोपवली आहे. या ठिकाणी सत्ता स्थापन झाल्यास शिवसेनेला उपाध्यक्षपद देण्याची मागणी करण्यात आली. मात्र बैठकीला उमरखेड येथील भाजप आमदार राजेंद्र नजरधने उपस्थित नसल्याने त्यासंदर्भात पूर्ण निर्णय होऊ शकला नाही. आता हा निर्णय घेण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी असलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर सोपवली आहे.

दारव्हा पालिकेत नगराध्यक्ष पदासोबतच सर्वाधिक जागा शिवसेनेने काबीज केल्या आहेत. मात्र ती संख्या बहुमत सिद्ध करणारी नाही. या ठिकाणी भाजपने जागांवर विजय मिळवला. त्यामुळे शिवसेना आणि भाजपने या ठिकाणी युती करून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय जवळ-जवळ निश्चित झाला आहे. या पालिकेसाठी भाजपने उपाध्यक्षपदासह सभापती पदांची मागणी केली आहे. त्यासोबतच पूर्वी एक स्वीकृत सदस्य पदही भाजपला देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यावर आता शिवसेनेने दोन्ही स्वीकृत सदस्य पद शिवसेनेकडेच द्यावे, असा विचार पुढे केला आहे. त्यामुळे या ठिकाणच्या युती संदर्भातही ठोस निर्णय झाला नाही. त्यासाठी दोन्ही पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आता पुन्हा चर्चा करणार आहेत. पुसद नगरपालिका निवडणुक शिवसेना आणि भाजप यांनी युती करून लढवली. त्यात युतीने १४ जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीच्या विरोधात जनतेने युतीला कौल दिला असल्याने कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीशी हात मिळवणी करायची नाही. त्या ठिकाणी नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आहे. मात्र युती करूनही बहुमतासाठी आवश्यक असलेली १५ ची बेरीज जुळलेली नाही. त्याविरोधात पुसदमध्ये राष्ट्रवादीने १२, तर काँग्रेसने जागेवर विजय मिळवला आहे. मात्र, भाजपच्या या निर्णयावर शिवसेनेकडून आणखी योग्य उत्तर देण्यात आलेले नसल्याने हा निर्णय सुद्धा अधांतरी राहिला आहे. या बैठकीला भाजपचे मदन येरावार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, सरचिटणीस अमर दिनकर, मनोज इंगोले, नीलय नाईक, तर शिवसेनेचे संजय राठोड, जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, विश्वास नांदेकर, राजेंद्र गायकवाड, गजानन डोमाळे, पराग पिंगळेसह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

अखेरचानिर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांवर : जिल्ह्यातीलचार नगरपालिकांमध्ये युती करण्याबाबत शनिवारी झालेल्या या बैठकीत अनेक बाबी सकारात्मक घडल्या असल्या, तरी एकाही ठिकाणी युतीसंदर्भात स्पष्ट निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता पदाधिकारी बैठक घेतील.

यवतमाळमध्ये जनतेचा कौल मान्य
यवतमाळ नगरपालिकेत भाजप बहुमतात आली असून, नगराध्यक्षपद मात्र शिवसेनेकडे गेले आहे. हा जनतेचा कौल मान्य करून या ठिकाणी काम सुरू ठेवायचे, असा विचार या बैठकीत पुढे आला. त्यावर एखादे सभापतिपद शिवसेनेला मिळावे असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले. त्यासंदर्भात कुठलेही ठोस उत्तर देता त्याचा विचार होईल, असे आश्वासन भाजपच्या वतीने देण्यात आले. त्यामुळे यवतमाळात प्रत्यक्ष युती करता नैसर्गिकरित्या तयार झालेली युती कायम राहण्याची शक्यता आहे.

पक्ष पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठकी : युतीसंदर्भातशनिवारी दुपारपासून विश्राम गृहात बैठकांचे सत्र सुरू झाले. त्यात प्रथम भाजपने त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतली, तर दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांची त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत वेगळी बैठक झाली. त्यानंतर दोन्ही पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यांची एकत्र बैठक झाली. त्यात दोन्ही पक्षांनी आपापले विचार मांडले. या बैठकीनंतर पुन्हा दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठकी झाल्या. त्यामुळे सायंकाळपर्यंत बैठकांचे हे सत्र सुरू होते. या बैठकांमध्ये केवळ चर्चा सुरू असल्याने ठोस निर्णय कधी होईल याची प्रतीक्षा असून, युती होईल की नाही याची उत्सुकता आहे.
बातम्या आणखी आहेत...