आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन नगराध्यक्षांनी घेतला भाजप प्रवेश, चांदूरबाजारमध्ये प्रहारला बसला जबर फटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आगामी नगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दोन विद्यमान नगराध्यक्ष, दोन माजी जिल्हा परिषद अध्यक्षांसह चार नगरसेवकांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. यात चांदूर बाजारच्या प्रहारच्या विद्यमान नगराध्यक्षा मनिषा नांगलिया, अचलपूरचे अपक्ष नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी, अचलपूरचे माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख, शेंदूरजनाघाटचे प्रशांत सावरकर, स्मिता अजमिरे, ओमप्रकाश कांडलकर, नीलेश बोथे, स्वाती आंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देविदास मालखेडे, रामदास कैथवास, दीपक इंगळे यांनी भाजपाचे कमळ हातात घेतले. जिल्ह्यातील नगर पालिकांच्या निवडणुकांसदर्भात पक्षाचे ध्येय धोरणे, आणि प्रचाराची दिशा ठरविण्याकरीता मुखंयमंत्र्यांच्या उपस्थितीत शहरातील एका आलिशान हॉटेल मध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर, विदर्भ संघटनमंत्री उपेन्द्र कोठेकर, खासदार संजय धोत्रे, कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर, अरूण अडसड, राज्यमंत्री प्रविण पोटे, डॉ.रणजीत पाटील,मदन येरावार आमदार डॉ. अनिल बोंडे, डॉ. वसुधा बोंडे, जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी, शहरअध्यक्ष जयंत डेहनकर, गजानन कोल्हे, रूपेश ढेपे, चेतन गावंडे, तुषार भारतीय, यांच्यासह पाचही जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी आणि नगरपरिषदेचे सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातून आलेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांकडून तेथील राजकिय परिस्थिती जाणून घेण्यात आली.
राजकीय उलथापालथ सुरू : आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर भाजपच्या गुरूवारी झालेल्या बैठकीत मोठी राजकीय उलथापालथ झाली. प्रहारचा बालेकिल्ला असलेले चांदूरबाजार,वरूड, शेंदूरजनाघाट नगरपरिषदेसह अचलपूरच्या राजकीय पटलावर भाजपने केलेल्या प्रहारामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
बातम्या आणखी आहेत...