आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी मिळाला महापालिकेला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती -  प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी अमरावती महापालिकेला प्राप्त झाला आहे. केंद्र शासनाकडून अमरावती महापालिकेला ३६.९४८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून घरांच्या निर्मितीसाठी म्हाडा या अभिकरणास उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 
प्रधानमंत्री आवास योजना शहरात ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रम अंतर्गत राबवली जात आहे. महानगरपालिकेत या योजनेंतर्गत मागणी सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये आतापर्यंत ५३ हजार ७९६ अर्ज प्राप्त झाले असून मनपाकडून मार्च २०१६ मध्ये घटक मधील ८६० घरांचा घटक मधील हजार १५८ घरांचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. राज्य शासनाने दोन्ही प्रस्तावास मंजूरी देवून ते केंद्र शासनास मान्यता सनियंत्रण समितीच्या मंजुरी करीता पाठविले होते. प्रस्तावानूसार महापालिकेला पहिल्या टप्पात एकूण ३६.९४८ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. केंद्र शासनाकडून राज्यातील एकूण १३ शहराकरिता राज्य शासनाला एकूण ३७१.५८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. राज्यस्तरीय मान्यता संनियंत्रण समिती आणि केंद्रीय मान्यता संनियंत्रण समितीने नमूद केलेल्या अटी-शर्तीच्या अधीन राहून सुकाणू अभिकरण असलेल्या म्हाडास निधी वितरीत करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरांचे बांधकाम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने २९ डिसेंबर २०१६ रोजी निधी वितरीत करण्याबाबत आदेश काढले आहेत. शिवाय शहरात विविध परिसरात लाभार्थ्यांच्या घरांच्या बांधकामाचे भूमीपूजन देखील करण्यात आले. शहरात योजना कार्यान्वित झाल्याने अर्ज दाखल केलेल्या उर्वरित लाभार्थ्यांच्या घराचे स्वप्न देखील लवकरच पूर्ण होण्याची आशा बळावली आहे. 

टप्प्या-टप्प्याने पैसे 
अावास योजनेचा निधी टप्प्या-टप्पाने मिळणार आहे. पहिला टप्पा ४० टक्के प्लिंथ लेवल, दुसऱ्या टप्प्यात ४० टक्के स्लॅब लेवल, तिसऱ्या टप्प्यात २० टक्के फिनिशिंग लेवल बांधकाम पुर्ण झाल्यावर निधी मिळणार आहे. अनुदान लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात गोळा होणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...