आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खून प्रकरणातील चार आरोपी अटकेत, गोपाल मिश्रा खून प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- शहरात नविन भाजीमंडी परिसरात पूर्ववैममनस्यातून धारदार शस्त्राने गोपाल उर्फ आशिष मिश्रा या युवकाचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी घडली असून या प्रकरणातील चौघांना उपविभागीय पोलिस अधिकारी राहूल मदने यांच्या पथकाने ताब्यात घेतले.

शहरात नवीन भाजीमंडी परिसरात पूर्ववैममनस्यातून धारदार शस्त्राने गोपाल उर्फ आशिष मिश्रा या युवकाचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी घडली. या प्रकरणातील चौघांना उपविभागीय पोलिस अधिकारी राहूल मदने यांच्या पथकाने ताब्यात घेतले. पन्न उर्फ हिरालाल जयस्वाल वय ३४ वर्ष रा. अरूनोदय सोसायटी, शेख अलीम उर्फ कवट्या रा. तलाव फैल, प्रशांत सालोडकर रा. प्रभात नगर आणि एका अल्पवयीन तरूणाचा यात सहभाग आहे. यातील पन्ना जयस्वाल हा दि. जुलैपर्यंत पोलिस कोठडीत आहे.

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नविन भाजीमंडीत दि. जुलै रोजी सकाळच्या सुमारास आशिष उर्फ गोपाल गंगाधर मिश्रा वय ३५ वर्ष रा. प्रभात नगर या युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. या प्रकरणी पन्न उर्फ हिरालाल जयस्वाल रा. अरुणोदय सोसायटी, याला शहर पोलिसांनी रविवारीच ताब्यात घेतले होते. दरम्यान पन्ना आला न्यायालयाने जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून याच प्रकरणातील शेख अलीम उर्फ कवट्या, प्रशांत सालोडकर आणि एका अल्पवयीन तरूणाला आज दि. जूलै रोजी धामणगाव मार्गावरून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राहूल मदने यांच्या पथकातील ईकबाल शेख, निलेश राठोड, प्रमोद मडावी, विजय जाधव, परेश मानकर यांनी केली. बुधवारी या तीघांना न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. याबाबतचा पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक राहूल किटे करीत आहे. सकृतदर्शनी खुनाची ही घटना पूर्व वैमनस्यातून घडल्याचे दिसत असले तरी इतर कारणांचा पोलिस आता शोध घेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...