आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासऱ्याच्या खून प्रकरणामध्ये जावयाला पाच वर्षांची शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सासऱ्याचा खून प्रकरणात आरोपी जावायाला येथील जिल्हा सत्र न्यायाधीश (क्रमांक २) एस. डब्ल्यू. चव्हाण यांच्या न्यायालयाने पाच वर्षांचा सश्रम कारावासाचा निर्णय शुक्रवारी (दि. १४) सुनावला आहे. संजय दामोधर बाळापूरे (३५, रा. नागपूर) असे आरोपीचे तर रमेश रामचंद्र तांबुस्कर (५३, रामजी बाबा देवस्थान परिसर, मोर्शी) असे मृतकाचे नाव आहे.
संजय बाळापुरे यांच्या राणी नावाच्या मुलीसोबत संजय बाळापुरेचा विवाह झाला होता. मात्र घरगुती वादामुळे राणी ही मोर्शीला वडिलांकडे राहत होते. दरम्यान जानेवारी २०१५ ला रात्री संजय बाळापुरे हा मद्य प्राशन करून सासऱ्यांकडे आला. यावेळी पत्नी राणीला आपल्यासोबत पाठवा, असा आग्रह त्याने धरला मात्र सासऱ्याने नकार दिल्याने वाद झाला. यावेळी बाळापूरेने खिशातील चाकू तांबुस्करच्या पोटात मारला. यामध्ये उपचारादरम्यान जानेवारी २०१५ ला त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी विमल तांबुस्कर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संजय बाळापुरेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास एपीआय शीतल मालटे यांनी पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून साक्षीदार तपासले. सदर प्रकरणात न्यायालयाने संजय बाळापुरेला सदोष मनुष्यवधाच्या कलमान्वये पाच वर्ष सश्रम कारावास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील अॅड. परिक्षित गणोरकर यांनी काम पाहिले.
बातम्या आणखी आहेत...