आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन भावांनी मिळून केली युवकाची हत्या, कांडलीत दिवसाढवळ्या पाडला एकाचा मुडदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा - मुलीची छेड काढत असल्याच्या कारणावरून दोन भावांनी मिळून एका युवकाची रॉडने मारून हत्या केली. ही घटनाशहरालगत असणाऱ्या कांडली येथील हरीतवाल नगर तलाठी कार्यालय परिसरामध्ये शुक्रवारी (दि. १) दुपारच्या सुमारास घडली. किशोर मोरेश्वर घोटकर (३४) असे मृतकाचे नाव आहे.
कांडली ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या वनश्री कॉलनी येथील रहिवासी किशोर घोटकर हा हरीतवाल नगर येथून जात असताना श्रीकांत शंकर दूरतकर (२३) शिवम शंकर दूरतकर (२१) या दोन भावांनी मिळून किशोरला थांबवून मुलीची छेड का काढतो, अशी विचारणा करत वाद घातला. यातच दोन्ही आरोपींनी रॉडने मृतकाला जबर मारहाण केली. त्यात किशोरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मृतकाच्या नातेवाईकांना देण्यात आली. दरम्यान श्रीकांत शिवम यांनी थेट पोलिस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले.मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून हत्या करण्यात आल्याचा प्राथमक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. श्रीकांत शिवम या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून,तपास सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...