आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधातून युवकाचा खून, दोन महिन्यांनंतर उलगडले खुनाचे रहस्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलसावंगी- जवळपास दोन महिन्यांपूर्वी फुलसावंगी येथून जवळच असलेल्या डोंगरगावजवळील पैनगंगा नदीपात्रात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या शरीरावरील जखमांवरून त्याचा खून झाल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी तपास करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. विलास काकडे (वय ३५), कोंडबा पिटलेवार (वय ३९), बाळ आढाव (वय ३४) सर्व रा. डोंगरगाव, ता. उमरखेड असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अनैतिक संबंधामध्ये अडसर येत असल्याने या युवकाचा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे.

मृत तरुण हा दराटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्य करत होता. सुनील ढेपे असे त्याचे नाव आहे. दरम्यान, प्रकरणाचा तपास हा दराटी पोलिसांनी हाती घेतला होता. पोलिसांनी घटनेतील सर्व दुवे बारकाईने तपासल्यानंतर तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना खाक्या दाखवताच खून अनैतिक संबंधात अडसर येत असल्यामुळे केल्याची कबुली अटकेतील सूत्रधारांनी दिली. सुनील ढेपे (वय २८), रा. डोंगरगाव जवळपास दोन महिन्यांपूर्वी शेजारच्या गावी नातेवाइकांकडे जेवणाच्या कार्यक्रमाला गेला होता. पण, रात्री तो घरी परतला नाही दुसऱ्या दिवशी ११ जुलै रोजी त्याचा जखमी अवस्थेतील मृतदेह पैनगंगा नदीपात्रात आढळला होता. जखमी अवस्थेवरून त्याचा खून झाल्याचे निदर्शनास येत होते. दराटी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सागर इंगोले यानी घटनेचा तपास आपल्या हाती घेतला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करून विलास काकडे, कोंडबा पिटलेवार, बाळू आढाव, सर्व रा. डोंगरगाव, ता. उमरखेड यांना संशयावरून अटक केली. त्यांनी पोलिसांना आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. पण, पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी विलासचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. यात सुनील नेहमी अडचणी निर्माण करत होता. याच रागातून साथीदारांच्या मदतीने सुनीलचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. तर, घटनेतील दुसरे आरोपी असलेल्या कोंडबा पिटलेवार, बाळू आढाव यांना मृतक सुनील जादूटोणा करतो, ज्यामुळे दोन भाऊ वडिलांचा मृत्यू झाल्याचा संशय होता. त्यामुळे आपल्यामागील काटा काढण्यासाठी त्यांनी सुनीलच्या खुनात सहकार्य केल्याची कबुली पोलिसांना दिली. ही कारवाई यवतमाळचे जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सागर इंगोले, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदवार पथकाने पार पाडली आहे.

आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे
याप्रकरणातील आरोपींनी गुन्हा कबूल केला. आम्हाला माहीत असलेला संपूर्ण घटनाक्रम आरोपींनी जबानीत दिला आहे. त्यांना ११ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सागरइंगोले, ठाणेदार, पोलिस स्टेशन, दराटी जिल्हा यवतमाळ.