आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध दांपत्याचा ठेचून खून, मृतदेह गावाबाहेर फेकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- भंडारा जिल्ह्यातील दावेझरी टोला येथील गावकऱ्यांनी जादूटोण्याच्या संशयावरून यादोराव (वय ६२) कौशल्याबाई ढोक (५५) या दांपत्याचा खून करून त्यांचे मृतदेह गावाबाहेर फेकून दिले. ही घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी बारा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दावेझरी टोला येथील मदन कुंभरे यांच्या पाच वर्षाच्या मुलाचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. यादोराव ढोक यांनीच मृत मुलावर जादूटाेणा केल्याचा गावकऱ्यांना संशय होता. मुलाच्या मृत्यूनंतर गावातील १५ ते १६ जणांनी यादोरावला मारण्याच्या इराद्याने त्याच्या घरावर हल्ला केला. परंतु तो घरी नसल्याने घरातील सामानाची तोडफोड केली. अधिक चौकशी केली असता यादोराव गावातील स्वामी सीतारामजी महाराज योगाश्रमात लपल्याचे कळाले. संतप्त गावकऱ्यांनी ढोक दांपत्याला आश्रमातून बाहेर आणून लाठ्याकाठ्यांनी झोडपून ठार मारले. नंतर दोघांचे मृतदेह गावापासून जवळच असलेल्या खदानीत नेऊन टाकले फरशा टाकून लपवले.

या प्रकरणी जादूटोणा प्रतिबंध उच्चाटन कायदा तसेच अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय जोगदंड करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...