आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलवारीचे घाव घालून नागपुरात तरुणाचा खून, संतप्त जमाव धडकला मुख्यमंत्र्यांच्या घरावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- पश्चिम नागपुरातील रामनगर परिसरात बुधवारी दिवसाढवळ्या तलवारी व शस्त्राचे घाव घालून एका तरुणाचा शेकडाे लाेकांसमक्ष निर्घृण खून करण्यात अाला.  थरकाप उडवणाऱ्या या घटनेमुळे संतप्त झालेल्या मृताचे नातेवाईक व इतर नागपूरकरांनी शहरात ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या निषेधार्थ मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठेतील घरावर धडक देत संताप व्यक्त केला. मात्र पाेलिसांनी त्यांना वेळीच राेखल्याने अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेतील काही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
  
रामनगर परिसरातील शिवमंदिराजवळ सकाळी अकराच्या सुमारास ही खळबळजनक  घटना घडली. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव खुशाल बाबूराव कुहिके  (३५) अाहे. तो तेलंगखेडी परिसरातील रहिवासी होता. खुशाल हा बुलेटवरून मोटारसायकलने रामनगर चौकातून शिवमंदिराकडे जात असताना सहा ते आठ मारेकऱ्यांनी त्याला थांबवून घेरले. काही कळायच्या आतच मारेकऱ्यांनी त्याच्यावर तलवारी व अन्य शस्त्रांनी हल्ला चढवला. डाेक्यात गंभीर घाव घातल्याने खुशालचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अाराेपींनी पळ काढला. 

अत्यंत रहदारीच्या या रस्त्यावर, शेकडो लोकांच्या समक्ष ही घटना घडली. मात्र, भीतीपायी लोकांनी मृतदेहाच्या जवळ जाण्याचेही टाळले. मारेकरी पसार झाल्यानंतरच लोकांनी घटनास्थळापासून अंतर राखूनच गर्दी केली.  काही वेळाने पाेलिसही घटनास्थळी पाेहाेचले.   

टोळीयुद्धाचा परिणाम  
टोळीयुद्धातून ही घटना घडल्याचे मानले जात आहे. महिनाभरापूर्वी याच परिसरात बग्गा नावाच्या गुन्हेगाराचा खून करण्यात आला होता. त्यात खुशालचा सहभाग नसला तरी तो त्या घटनेतील आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी मदत करीत होता, असे बोलले जाते. त्यातूनच खुशालचा काटा काढण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. 

पुढील स्लाइडवर वाचा, मृत व्यावसायिकांच्या नातेवाईकांंचे मुख्यमंत्र्यांच्या बंद घराबाहेर निदर्शने... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)