आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या वादातून तलावफैलमध्ये शस्त्राने खून, तलावफैल परिसरातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- जुन्यावादाच्या कारणावरून ४२ वर्षीय इसमाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना तलावफैल परिसरातील बुध्दविहाराजवळ सोमवारी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास घडली. अविनाश आनंदराव मेश्राम वय ४२ वर्ष रा. तलावफैल असे मृतकाचे नाव आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास अविनाश मेश्राम यांच्या मुलासोबत प्रदीप मधुकर नंदेश्वर वय २८ वर्ष याचा वाद झाला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा सुध्दा नोंद करण्यात आला होता. दरम्यान, सोमवारी रात्रीच्या सुमारास याच वादाचा वचपा काढण्यासाठी प्रदीप नंदेश्वर याने अविनाश मेश्राम याच्यावर तलावफैल परिसरात धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला चढवला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी नागरिकांना धाव घेवून अविनाशला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी मंगेश अजाबराव गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी प्रदीप नंदेश्वर याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक झळके करीत आहे.