आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लीम नरसंहाराचा दिग्रसमध्ये निषेध, हजारो मुस्लीम बांधवांनी काढला मूक मोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्रस - म्यांनमार येथे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या नरसंहाराचा दिग्रस शहरात आज, दि. १५ रोजी जाहीर निषेध करण्यात आला. दिग्रसचे काजी मौलाना अबु जफर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मूक मोर्चात हजारो मुस्लीम बांधव सामील झाले होते. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून लिहिलेल्या तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आलेल्या निवेदनात रोहिंग्या मुस्लिमांचा नरसंहार थांबविण्यासाठी प्रयत्न करावे, तसेच संयुक्त राष्ट्र संघात हा मुद्दा रेटावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर दुपारी वाजता शहरातील मुख्य जामा मस्जिद इतर मस्जिदीमधील हजारो मुस्लीम बांधव मूक मोर्चाद्वारे तहसील कार्यालयावर पोहोचले. यावेळी तहसीलदार किशोर बागडे यांना निवेदन देण्यात आले. दिग्रसचे काजी मौलाना अबु जफर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या सदर मूक-मोर्चाच्या निवेदनावर हाजी शौकत अली मलनस, पालिकेचे शिक्षण सभापती सैयद अकरम, हाजी सैयद शहजाद, मुहम्मद जाफर, मिर्जा अफजल बेग, समीर पटेल, मुहम्मद जसीम मौलाना, आमद धारीवाला, अॅड. ताज मलनस, सलीम चौहान, अरबाज धारिवाला, कादर नागानी, हफीज पटेल, मुहम्मद सादिक, रहीम रिजवी, मुहम्मद खिजर, जमीर खान, फयाज मलनस, आसिफ खान, रमजान ताज कव्वाल, इमरान खान, वसीम रिजवी, साहेब खान, मुहम्मद आसिफ, सलीम सौदागर, मुहम्मद इशतीयाक, जावेद खान, जाकिर मलनस सह अनेकांच्या स्वाक्षरी आहे. यावेळी सुमारे दीड-ते-दोन हजार मुस्लीम बांधव उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...