आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भातील नगर परिषद निवडणुकीत BJPला स्पष्ट बहुमत; सात नगराध्यक्षापदावर ताबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विदर्भ माझा पक्षाच्या उमेदवाराची भाजप आमदाराने गाडी फोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल. - Divya Marathi
विदर्भ माझा पक्षाच्या उमेदवाराची भाजप आमदाराने गाडी फोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल.
नागपूर- नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील ११ नगरपरिषदांच्या निकालांमध्ये भाजपला संमिश्र यश मिळाले आहे. चार नगर परिषदांमध्ये स्पष्ट बहुमत तर सात नगराध्यक्षांच्या पदांवर भाजपने ताबा मिळवला आहे. नगर परिषदांचे निकाल नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेंद्र मुळक, आमदार सुनील केदार या नेत्यांसाठी धक्का देणारे ठरले आहेत. 

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यातील या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते. रविवारी मतदानानंतर सोमवारी लागलेल्या निकालांमध्ये भाजपला संमिश्र यश मिळाल्याचे दिसत आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक, उमरेड, सावनेर, खापा नगर परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून रामटेक, उमरेड, सावनेर, कळमेश्वर, खापा, गोंदिया, तिरोडा अशा सात नगर परिषदांच्या नगराध्यक्षपदांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. यापैकी रामटेक नगर परिषद भाजपने शिवसेनेकडून तर उमरेड नगर परिषद काँग्रेसकडून खेचून आणली. रामटेकमध्ये १७ पैकी १३ जागांवर भाजपने यश मिळवले तर शिवसेनेला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. त्याचवेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कामठी नगर परिषदेत भाजपला मोठाच धक्का बसला आहे. काँग्रेसने ३२ पैकी १६ जागांवर विजय मिळवत कामठी नगर परिषदेवर ताबा मिळवला आहे. तर भाजपला ८ तर सहयोगी बहुजन रिपब्लिकन एकता मंचाला २ जागा मिळाल्या आहेत.  काटोल नगर परिषदेत विदर्भ माझा पक्षाने बाजी मारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख यांना धक्का बसला असून नरखेडमध्ये राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळवता आलेले नाही. सावनेरमध्ये सुनील केदार यांचा प्रभाव संपवून भाजपने बाजी मारली तर उमरेड नगर परिषदेवर १० वर्षानंतर ताबा मिळवून भाजपने माजी मंत्री राजेंद्र मुळक यांना जोरदार धक्का दिला आहे.  
 गोंदिया जिल्ह्यात भाजपला अपेक्षित यश मिळालेले नाही.  गोंदिया आणि तिरोडा या दोन नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष पदांवर भाजपला ताबा मिळवता आला असला बहुमत मात्र मिळाले नाही. गोंदियात १८ जागा मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला तर काँग्रेसने ९ जागा जिंकून दुसरे स्थान मिळवले आहे. तिरोडा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी ९ जागा मिळवत बहुमत मिळवले असले तरी नगराध्यक्षांचे पद मात्र भाजपला मिळाले आहे. 

नगराध्यक्षांची यादी पुढीलप्रमाणे... 
रेखा मोवाडे, भाजप (सावनेर)     
विजयलक्ष्मी भदोरिया, भाजप (उमरेड)  
वैशाली ठाकूर, विदर्भ माझा (काटोल) 
अभिजीत गुप्ता, नगरविकास आघाडी (नरखेड)
प्रियांका मोहिते, भाजप (खापा नगरपरिषद)
शोभा कऊटकर, काँग्रेस (मोहपा)
सोनाली देशपांडे, भाजप, तिरोडा नगरपरिषद (गोंदिया)
सहजा सपास, काँग्रेस (कामठी) 
स्मृती इखार, भाजप (कळमेश्वर नगरपरिषद)
दिलीप देशमुख, भाजप (रामटेक) 
अशोक इंगळे, भाजप (गोंदिया) 


जिल्हानिहाय कोणाला कुठे बहुमत?
भाजप – रामटेक, उमरेड, सावनेर, खापा,
काँग्रेस – कळमेश्वर (राष्ट्रवादीसह ), मोहपा
राष्ट्रवादी – नरखेड (काठावरचे बहुमत)
विदर्भ माझा – काटोल
 
सावनेर – एकूण जागा – 20
भाजप – 14
काँग्रेस – 06
नगराध्यक्ष – रेखा मोवाडे, भाजप

उमरेड – एकूण जागा – 25
भाजप – 19
काँग्रेस – 6
नगराध्यक्ष – विजयलक्ष्मी भदोरिया, भाजप

काटोल – एकूण जागा – 23
विदर्भ माझा – 18
शेकाप – 4
भाजप – 1
काँग्रेस – 0
राष्ट्रवादी – 0
नगराध्यक्ष – वैशाली ठाकूर, विदर्भ माझा

नरखेड – एकूण जागा – 17
राष्ट्रवादी – 8
नगरविकास आघाडी  – 5
शिवसेना – 3
अपक्ष -1
नगराध्यक्ष – अभिजीत गुप्ता, नगरविकास आघाडी

खापा नगरपरिषद – एकूण जागा – 17
भाजप – 15
काँग्रेस – 1
अपक्ष – 1
नगराध्यक्ष – प्रियांका मोहिते, भाजप

मोहपा – एकूण जागा – 17
काँग्रेस – 10
भाजप – 5
शिवसेना – 2
नगराध्यक्ष – शोभा कऊटकर (काँग्रेस)

तिरोडा नगरपरिषद – एकूण जागा 17
राष्ट्रवादी – 9
भाजप – 5
शिवसेना 2
अपक्ष – 1
नगराध्यक्ष – सोनाली देशपांडे (भाजप)

कामठी – एकूण जागा – 32
काँग्रेस – 7
भाजप – 2
शिवसेना – 1
बसपा -1
अपक्ष – 1
MIM -1

कळमेश्वर नगरपरिषद – एकूण जागा – 17
काँग्रेस – 8
राष्ट्रवादी – 2
भाजप – 5
शिवसेना 2
भाजप 5
नगराध्यक्ष – स्मृती इखार (भाजप)

रामटेक एकूण जागा – 17
भाजप -13

शिवसेना – 2
काँग्रेस – 2
नगराध्यक्ष – दिलीप देशमुख, भाजप

गोंदिया – एकूण जागा – 42
भाजप – 18
राष्ट्रवादी – 7
काँग्रेस – 9
शिवसेना – 2
बसपा – 5
अपक्ष – 1
नगराध्यक्ष – अशोक इंगळे, भाजप

कामठी
- काँग्रेस 4 जागांवर विजयी.
- भाजप 2, शिवसेना- 1, बसपा-1, अपक्ष -2 जांगावर विजयी. 

उमरेड 
- 8 पैकी 5 जागांवर भाजप विजयी.

काटोल
- विदर्भ माझा पक्षाची घोडदौड. 10 जागांवर विजय.
- शेकापचे राजेश राठी आणि कविता काळे विजयी. 

कळमेश्वर 
- काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता. 17 पैकी 10 जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी. 
- नगराध्यक्षपदी भाजपच्या स्मृती इखारे विजयी झाल्या आहेत.

रामटेक
- नगराध्यक्षपदी भाजपचे दिलीप देशमुख विजयी. 
- 13 जागांवर भाजप विजयी. 
- शिवसेना - 2
- काँग्रेस - 2 जांगावर विजयी 

नरखेड
- त्रिशंकू स्थिती. 

मोहपा नगरपंचायत 
- 17 पैकी 10 जागांवर काँग्रेस विजयी. 
- काँग्रेससच्या शोभा काऊटकर नगराध्यक्षपदी विजयी.
 
गोंदायात दोन नगर परिषदांची मतमोजणी सुरु आहे. 
- तिरोडा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता राखली आहे. मात्र कळमेश्वर प्रमाणेच येथेही नगराध्यक्षपद भाजपने पटकावले आहे. सोनाली देशपांडे येथे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. 
- बॅलेट मशिनवर स्वाक्षरी असल्याने दोन गटांमध्ये शाब्दिक चमकम झाली. यामुळे मतमोजणीला उशिर झाला. संथ गतीने मतमोजणी सुरु आहे. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...