आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युगच्या मारेकऱ्यांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - युग चांडक या बालकाचे अपहरण व खून खटल्यातील दाेन्ही अाराेपींच्या फाशीच्या शिक्षेवर नागपूर खंडपीठानेही गुरुवारी शिक्कामोर्तब केले. जिल्हा न्यायालयाने आरोपी राजेश दवारे व अरविंद सिंह या दोघांना कलम ३६४ अ कलमान्वये फाशी, खुनाच्या कलमांतर्गत फाशी, १२० ब कलमानुसार जन्मठेप व १० हजार रुपये दंड, २०१ कलमांतर्गत पुरावा नष्ट करण्याच्या आरोपासाठी ७ वर्षे शिक्षा व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती.

या शिक्षेवर खंडपीठाने शिक्कामाेर्तब केले. या घटनेमुळे समाजमनावर झालेल्या परिणामांची तीव्रता पहाता त्याकडे न्यायपालिकेला डोळेझाक करणे शक्य नाही, असे मत न्यायमूर्तींनी व्यक्त केले. १ सप्टेंबर २०१४ रोजी डॉ. मुकेश चांडक यांचा मुलगा युग याचे अपहरण करुन त्याचा खून करण्यात अाला हाेता. अाराेपी राजेश हा चांडक यांच्या दवाखान्यात पूर्वी काम करायचा. मात्र चाेरीचा अाराेप करुन डाॅ. मुकेश यांनी त्याला कामावरुन काढले हाेते. याच रागातून अरविंदच्या मदतीने त्याने युगचा खून केला हाेता.
बातम्या आणखी आहेत...