आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagpur Bench Of Bombay High Court Upholds 'dry Chandrapur' Fiat

चंद्रपुरातील दारूबंदी निर्णयावर नागपूर खंडपीठाचे शिक्कामोर्तब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- मद्यव्यापार हा मूलभूत अधिकार नसल्याचे सांगत शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात लागू केलेली दारूबंदी कायद्याच्या चौकटीतच असल्याचा निर्वाळा नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिला. चंद्रपूर लिकर ट्रेडर्स असोसिएशन आणि ३० व्यापाऱ्यांनी सहा रिट याचिकांच्या माध्यमातून दारूबंदीला आव्हान दिले होते.

दारूबंदीचा निर्णय नैसर्गिक न्यायाविरोधात असून संबंधित क्षेत्रातील सुमारे १५ हजार कामगारांच्या रोजगाराकडे दुर्लक्ष केले गेले. कायद्यातील तरतुदींच्या दृष्टीनेदेखील मद्यावरील बंदी अयोग्य असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा होता.