आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

111 वर्षांपासून धावणाऱ्या रेल्‍वे लाइनला कायमचाच 'थांबा', फुलांचा चढवला साज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सायंकाळी 6.20 वाजता नागपूर-रामाकोना पॅसेंजरने नागपूर स्टेशनवर शेवटचाच विराम घेतला. - Divya Marathi
सायंकाळी 6.20 वाजता नागपूर-रामाकोना पॅसेंजरने नागपूर स्टेशनवर शेवटचाच विराम घेतला.
नागपूर - येथून छिंदवड्याकडे (मध्यप्रदेश) जाणारी छोटी रेल्‍वे लाइन सोमवारी कायमचीच बंद करण्‍यात आली. त्‍यामुळे 111 वर्षांचा प्रवास थांबला. या शेवटच्‍या प्रवासाचे साक्षीदार होण्‍यासाठी शेकडो प्रवासी आणि रेल्‍वे कर्मचाऱ्यांनी या ट्रेनने सोमवारी प्रवास केला. अनेकांनी ट्रेनसोबत सेल्फीसुद्धा काढली. सायंकाळी 6.20 वाजता नागपूर-रामाकोना पॅसेंजरने नागपूर स्टेशनवर शेवटचाच विराम घेतला. दरम्‍यान, या रुळावरून धावणाऱ्या ट्रेनला फुलांनी सजवले होते.

का बंद केली रेल्‍वे लाइन
ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्‍यासाठी रेल्वेच्या नागपूर विभागातील नॅरोगेजच्या पाच मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्‍याचा निर्णय झाला आहे. त्‍यामुळे या पाचही मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्याची अधिसूचना काढण्यात आली. यामुळे नॅरोगेज ट्रेनमध्ये जगातील सर्वाधिक गतीने धावणारी सातपुडा एक्‍स्‍प्रेस आणि नागपूरहून मध्य प्रदेशात जाणाऱ्या सर्व गाड्या बंद होणार आहेत. मात्र, महाराष्ट्रात अजूनही नॅरोगेजचा एक मार्ग सुरू राहणार आहे. नागपूर-नागभीड या मार्गावर रेल्वे सेवा सुरू राहणार आहे. या मार्गाचे अनेकदा सर्वेक्षण झाले. आर्थिक बाबीच्या कारणामुळे या मार्गाच्या रूपांतराचा प्रस्ताव अजून थंडबस्त्यात आहे.

या गाड्या झाल्‍या बंद
नागपूर ते छिंदवाडापर्यंत पॅसेंजर गाडी क्रमांक 58831 सकाळी 4.55 वाजता, क्र. 58833 सकाळी 7.05 वाजता, 58835 सायंकाळी 4 वाजता, 58837 रात्री 10.30 वाजता नियमित चालत होती. या शिवाय ट्रेन क्रमांक 58839 नागपूर-जबलपूर दुपारी 12.45 वाजता आणि 58841 नागपूर-रामकोना सायंकाळी 6.15 वाजता धावत होती. या सोबतच छिंदवाडा ते नागपूरकडे येणाऱ्या ट्रेन क्रमांक 58832, 58840, 58834, 58836, 58838 आणि 58842 पॅसेंजर रोज धाव होत्‍या.

1 ऑक्‍टोबरला यांचा प्रवास थांबला होत्‍या
पहिल्‍या टप्‍प्‍यात 1 ऑक्‍टोबरपासून जबलपूर-नैनपूर खंड छोटी लाइनला बंद करण्‍यात आले. त्‍यामुळे 58839 नागपूर-जबलपूर, 58863 बालाघाट-जबलपूर, 58865 बालाघाट-जबलपूर, 58867 बालाघाट-जबलपूर, 58869 बालाघाट-जबलपूर, 58864 जबलपूर-बालाघाट, 58866 जबलपूर-बालाघाट, 58876 जबलपूर-नैनपूर, 58868 जबलपूर-बालाघाट, 58840 जबलपूर-नागपूर, 58870 जबलपूर-बालाघाट, 58873 बालाघाट-नैनपूर, 58871 बालाघाट-जबलपूर, 58864 जबलपूर-बालाघाट, 58866 जबलपूर-बालाघाट, 58876 जबलपूर-नैनपूर, 58868 जबलपूर-बालाघाट, 58840 जबलपूर-नागपूर, 58870 जबलपूर-बालाघाट, 58874 नैनपूर-बालाघाट, 58858 मंडलाफोर्ट-बालाघाट, 58864 जबलपूर-बालाघाट, 58868 जबलपूर-बालाघाट, 58870 जबलपूर-बालाघाट या गाड्यांचा प्रवास थांबवण्‍यात आला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज.....