आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात पेटले स्वच्छतेचे दीप , घरगुती साफसफाईतून रोज निघतो ५० टन कचरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील काही भागांमध्ये सिमेंट रस्ते, पेव्हींग ब्लॉक बसविल्याने सौंदर्य प्राप्त होऊन चकचकीतपणा आला आहे. स्वच्छ झालेले हे रस्ते असेच कायम ठेवण्यासाठी या सौंदर्यीकरणाच्या कामातून नागरिकांना स्वच्छतेची प्रेरणा मिळाली असून, या परिसरातील नागरिक स्वयंस्फूर्तीने या विकासकामांची निगा राखत असल्याचे प्रेरणादायी चित्र निर्माण झाले आहे. शहराच्या काही भागात पेटलेली स्वच्छतेच्या या मिनमिनत्या पणतीने हा परिसर उजळून टाकला आहे. या मिनमिनत्या वातीच्या मशाली होऊन स्वच्छतेचा प्रकाश अस्वच्छतेच्या कानाकोपऱ्यात जाऊन तोही परिसर उजळावा अशा प्रतिक्रिया शहरातील सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
शहरातील अनेक भागात नागरिकांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ते, पेव्हींग ब्लॉक लावत सौंदर्यीकरणाची कामे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. पूर्वी मातीची तसेच खडतर असलेली रस्ते सिमेंट कांक्रीट आणि पेव्हींग ब्लॉकने चकाकल्याने तेथे कचरा साचू नये याची दक्षता घेताना संबंधित परिसरातील नागरिक दिसून येत आहे. घराबाहेर दिसून येणारे कचऱ्याचे ढिगांचा निचरा पेव्हींग ब्लॉकमुळे झाला आहे. चकाकलेले घरासमोरील रस्ते पुन्हा कचऱ्याने माखू नये म्हणून दक्षता घेतली जात असल्याचे चित्र या भागांमध्ये दिसून येत आहे. घरातून निघणारा कचरा इतरत्र फेकता महापालिकेच्या घंटीगाडीत टाकला जात आहे. आनंदाचे पर्व असलेल्या दिपावली निमित्य प्रत्येक नागरिकांच्या घरात साफसफाईची कामे केल्या जात आहे. साफसफाईमुळे शहरात दरराेज ५० टन कचऱ्याची वाढ झाली आहे. आधी गाव झाडून काढत नंतर किर्तन करणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या आदर्शाची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ अमरावती शहरात होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जिल्हापरिषद कॉलनी : प्रशांतनगर बगिचा जवळील जिल्हा परिषद कॉलनीत नागरिकांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये किशोर चौधरी, देवीदास काळकर, आशिष पंडीत, रामेश्वर माहुरे, अविनाश वैद्य, संजय देशमुख, नितीन अटाळकर, ए. एन. पाटील, प्रमोद देशमुख, रवी देशमुख, रवींद्र जवंजाळ यांचा समावेश आहे.

प्रमोदकॉलनीत पुढाकार : राजापेठपरिसरातील प्रमोद कॉलनी येथील नागरिकांनी अश्या प्रकारे स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये आकाश माणिकपुरे, सौरभ रावणकर, सुनील ढोबळे, पिंटू वाढे, रवींद्र खोलकुटे, सचीन कुळकर्णी, अभय कुळकर्णी, अमोल चवणे, धनंजय पातुर्डे यांचा समावेश आहे.

श्यामनगरात फलक : पूर्वीघरासमोर कचऱ्याचे ढिग साचत होते. श्याम नगरात पेव्हींग ब्लॉक लावण्यात आल्याने कचऱ्याचे ढिग नाहीसे झाले. दिनेश घटारे यांनी कचरा टाकण्याचे निवेदन करणारे फलकच लावले. परिसर स्वच्छतेसाठी सविता तराळ, सिमा काळे,नीलेश सराड
अस्वच्छतेच्या भानगडीतून फौजदारी गुन्हे दाखल
शहरात स्वच्छतेबाबत जागृकता वाढत आहे. स्वच्छ केलेल्या परिसरात अस्वच्छता केल्याने वाद निर्माण होऊन दोघांनी दिलेल्या परस्पर विरोधी तक्रारीवरून फौजदारी गुन्हे दाखल होण्याची घटना शहरातील भूमिअभिलेख कॉलनीत मंगळवारी घडली. फ्रेझरपुरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भूमिअभिलेख कॉलनीत एका महिलेच्या तक्रारीवरून पोलीसांनी संबधीत व्यक्ती विरोधात भादवीच्या कलम २९४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या महिलेच्या घरासमोरील अंगणात संबधीत व्यक्तीने कचरा टाकला यावरून त्यास हटकले असता त्याने जिवे मारण्याची धमकी दिली असे महिलेच्या तक्रारीत म्हटले आहे. तर गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीच्या तक्रारीवरूनही पोलिसांनी अन्य एका परिवाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महापालिकेची अशीही दक्षता
Àकामगारांची वेळा हजेरी
Àकचऱ्याची तत्काळ उचल
Àठरवून दिलेले काम बघणे
Àकचरा कंटेनरमध्ये साचवणे
Àघरा-घरातून कचऱ्याचे संकलन
Àकंत्राटदारांना सुचना
Àगैरहजर कर्मचाऱ्यांचे निलंबन
Àकंत्राटदारावर दंडात्मक कारवाई
Àप्लॅस्टिक प्रोसेसिंग यूनीट सुरू
Àइतवारा येथे ओल्या कचऱ्यातून खत निर्मिती
Àबिटप्युन, निरीक्षकांवर विशेष जबाबदारी

बातम्या आणखी आहेत...