आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात सराफावर गाेळी झाडून 21 लाखांची लूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नागपूर- कन्हान येथील अमित ज्वेलर्स या सराफा पेढीवर दरोडेखोरांनी रविवारी भरदुपारी दरोडा टाकून सुमारे २१ लाखांचा ऐवज लुटून नेला. गावठी बंदुकीतून सराफा व्यावसायिकाच्या पायावर गाेळ्या झाडत अाराेपींनी पळ काढला. यात सराफा दुकानदार जखमी झाले अाहेत.  
 
कन्हान येथील गणेशनगर परिसरातील आंबेडकर चौकात अमित गुप्ता यांचे सराफा दुकान आहे. गुप्ता हे रविवारी नेहमीप्रमाणे दुकानात बसले होते. दुपारच्या सुमारास दोन मोटारसायकलवरून चार दरोडेखोर गावठी बंदूक घेऊन दुकानात आले. त्यातील एक दुकानाबाहेर उभा राहिला, तर तिघे आत गेले.  दुकानापासून काही अंतरावर त्यांनी गाड्या पार्क केल्या.
 
दुकानात आल्या आल्या दरोडेखोरांनी मुख्य दरवाजासमोर दोन फायरिंग केल्या. त्यानंतर आतमध्ये गेलेल्या तिघांनी बंदुकीच्या धाकावर  सोन्या-चांदीचे दागिने लुटले. आपण पळून गेल्यावर गुप्ता यांनी पोलिसांत जाऊ नये म्हणून त्यांच्या दोन्ही पायांवर गोळ्या झाडल्या व अाराेपी पळून गेले. गाेळीबारात गुप्ता  जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू अाहेत.
बातम्या आणखी आहेत...