आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी शेजारी राज्यांशी रोज माहितीचे आदान-प्रदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्यात आंतरराज्य गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी आता शेजारी राज्यांच्या पोलिस यंत्रणांशी दैनंदिन स्वरूपाचा समन्वय साधणारी व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. या व्यवस्थेत दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागांचा समावेश असलेले विशेष झोन तयार करण्यात येणार असून या झोनमधील महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी आपापल्या भागात घडलेली गुन्हेगारी तसेच गुन्हेगारांच्या माहितीचे आदान-प्रदान करणार आहेत, अशी माहिती
राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी नागपुरात दिली.
माथूर म्हणाले, आपल्या क्षेत्रात घडलेल्या गुन्ह्यांच्या माहितीमुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गुन्हे करणाऱ्या आणि नंतर परत आपल्या राज्यात पळून जाणाऱ्या गुन्हेगारांवर अंकुश बसणार आहे. हे झोन एक प्रकारे पोलिस युनिटच मानले जाईल. अलीकडेच केंद्राकडून आयोजित करण्यात आलेल्या राज्यांच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत ही संकल्पना राबविण्याचा निर्णय झाला. लवकरच त्यावर अंमलबजावणी होईल. विशेषत: घातक शस्त्रांची तस्करी करून होणाऱ्या गुन्हेगारीवर आळा घालण्याचे यातून प्रयत्न होतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वृत्तीला आळा बसेल. सीमावर्ती भागातील क्षेत्रांत विविध झोनची निर्मिती करण्यात येत आहे. यामुळेही नक्षली कारवायांवर नियत्रंण मिळवता येईल, असेही माथूर यांनी सांगितले. या वेळी त्यांनी पत्रकारांच्या इतर प्रश्नांनाही उात्तरे दिली.

आधुनिक शस्त्रांचा पुरवठा
नक्षलवाद्यांच्या कारवायांचा बीमोड करण्यासाठी गडचिरोलीसह इतर जिल्ह्यांच्या पोलिसांना नुकतीच आधुनिक शस्त्रे पुरविण्यात आली असून काही नव्या योजना तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले. गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या कारवाया नसल्याची केंद्र सरकारची धारणा असली तरी राज्य पोलिसांचे मत वेगळे असून हा जिल्हा नक्षलमुक्त घोषित करण्याचा प्रस्ताव नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...