आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर : पत्नीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या वकिलास पतीकडून काेर्टात मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - पत्नीला मोबाइलवर आक्षेपार्ह मेसेज पाठवणाऱ्या वकिलास संबंधित महिलेच्या पतीने कानशिलात लगावल्याची घटना मंगळवारी सकाळी नागपूर खंडपीठातील बाररूममध्येच घडली. या प्रकरणात पोलिसांनी वकिलाविरुद्ध विनयभंगाचा तर वकिलाच्या तक्रारीवरून संबंधित महिलेच्या पतीवर मारहाणीचा गुन्हा नोंदविला अाहे.

मंगळवारी सकाळी न्यायालयातील बाररूममध्ये वकिलांची बऱ्यापैकी वर्दळ असताना हा प्रकार घडला. अॅड. नितीन खांबोरकर हे बाररूममध्ये असताना एक महिला तिच्या पतीसह तेथे दाखल झाली. तिच्या पतीने अॅड. खांबोरकर यांच्यावर पत्नीला मोबाइलवर अश्लील मेसेज पाठविल्याचा आरोप करीत मेसेज दाखविले. यावर झालेल्या बाचाबाचीत पीडित महिलेच्या पतीने अॅड. खांबोरकर यांना थप्पड लगावली. या घटनेनंतर न्यायालयाच्या परिसरातही अॅड. खांबोरकर यांना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर पीडित महिलेने राणाप्रतापनगर पोलिस ठाणे गाठून अॅड. खांबोरकर यांच्याविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या आणखी आहेत...