आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्ह्यांंची उपराजधानी: नागपुरात मटण विक्रेत्यावर दिवसाढवळ्या गोळीबार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- आर्किटेक्ट निमगडे यांना गोळीबार करून संपविण्याच्या घटनेला अाठही दिवस उलटत नाहीत ताेच साेमवारी एका मटण विक्रेत्यावर गोळीबार झाल्याच्या घटनेने उपराजधानी हादरून गेली. भूखंडाच्या वादातून हा गोळीबार करण्यात आला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. या घटनेत मोहंमद यासीन कुरेशी मोहंमद हाशीम कुरेशी (३०) हा मटण विक्रेता जखमी झाला.

रामेश्वरी ते मानेवाडा रिंगरोड दरम्यान ओंकारनगर चौकात यासीनचे दुकान आहे. त्याच्या दुकानाला लागून ३२ हजार चौरस फूट जागा आहे. त्यापैकी काही जागेची विक्री झाली असून अाता १० हजार ८०० चौरस फुटांचा भूखंड शिल्लक आहे. कोट्यवधीच्या असलेल्या या भूखंडापैकी सुमारे ३ हजार चौ. फुटांवर यासीनचे मटण शाॅप आहे. किशोर पांडे यांच्या मालकीच्या असलेल्या या जागेवर यासीनचे वडील हाशीम यांनी दावा केला आहे. या जागेसंदर्भात २५ वर्षांपासून दिवाणी न्यायालयात खटला सुरू आहे. मात्र खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच पांडे यांनी अनेकांना भूखंड िवकले. त्यापैकीच एक रवीकुमार गुप्ता व गांधी नावाचे बिल्डर जागा रिकामी करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकीत असल्याचा आरोप हाशीम यांनी केला आहे.

दाेघांनी झाडल्या गाेळ्या
सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास काही मजूर मोकळ्या जागेवर खड्डे खोदण्यास आले होते. त्या संदर्भात अजनी पोलिस ठाण्यात तक्रार देऊन यासीन परत आल्यावर काही वेळ दुकानातच थांबला होता. सुमारे १२.३० च्या सुमारास तो अभय नगरातील द्वारकापुरी येथे मित्राला भेटण्यासाठी गेला. मित्राच्या घरासमोर गाडी लावत असतानाच दोन अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार केला. एक गोळी त्याच्या उजव्या हाताला चाटून गेली. आवाज ऐकून समोरच्या बांधकामावरील मजूर बाहेर आले त्यावेळी लाल शर्ट घातलेले दोघे पळून जाताना दिसले. घटनेनंतर यासीन याने आपल्यावर गोळीबार झाल्याचे मित्राला सांगून दुकानात परत आला व तिथून रुग्णालयात दाखल झाला.
कुख्‍यात गुंड आशिषची हत्‍या..
नागपूरातील सक्करदरा भागातील कुख्यात गुंड आशिष संजय राऊत (वय २४) याची तीन ते चार जणांनी हत्‍या केली आहे. आशिषवर चाकूचे सपासप वार करुन निर्घृणपणे त्‍याची हत्या करण्‍यात आली. खंडणी वसूलीच्या वादातून ही हत्या झाली, असा अंदाज पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे.
मायकेलवर हल्‍ला..
नागपूरातील मायकेल नावाच्‍या एका गुंडावर त्‍याच्‍या विरोधी गटातील आरोपींनी प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्‍ल्यात मायकेल गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी केवळ एका तासाच्या अंतराने वर्दळीच्या भागात या घटना घडल्या आहेत त्‍यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आर्किटेकची हत्‍या- नागपुरात गुन्हेगारीचा अालेख दिवसेंदिवस वाढतच चालला अाहे. एका ७२ वर्षीय आर्किटेक्टवर पाच गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आल्याची थरारक घटना मंगळवारी सकाळी घडली. जमिनीच्या वादातून हे प्रकरण घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून या घटनेत ‘सुपारी किलर’चा वापर झाल्याचे संकेत मिळत आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, नागपूरातील रक्‍तरंजित थराराच्‍या या तीन घटना..
हत्‍या झाल्‍या त्‍या रहदारीच्‍या परिसरातील फोटोही आम्‍ही आपल्‍याला दाखवत आहोत..
बातम्या आणखी आहेत...