नागपूर- दत्तक मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्थेतील (नीरी) निवृत्त वैज्ञानिक डॉ. मकसूद हसन अन्सारी (वय ७२) याला पाेलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याची सहा सप्टेंबरपर्यत पोलिस कोठडीत रवानगी केली. अमरावती तसेच आजूबाजूच्या परिसरातील कुटुंबांतून तीन मुली दत्तक घेतल्याचे अन्सारीने चाैकशीत सांगितले. या तिन्ही मुली अनुक्रमे साेळा, अकरा सहा वर्षांच्या अाहेत. सध्या त्यांना शासकीय विद्यार्थीगृहात ठेवण्यात अाले अाहे.
एकट्या पुरुषाला, जास्त वयाेमान असलेल्यांना मुली दत्तक घेता येत नसल्याचा नियम अाहे. मग अन्सारीने या मुली दत्तक घेतल्याच कशा? असा प्रश्न पाेलिसांना पडला अाहे. दरम्यान, या मुलींच्या कुटुंबियांचे पत्ते मिळवून त्यांच्याकडे चाैकशीसाठी पाेलिस पथक अमरावतीला रवाना झाले अाहे. यापैकी सोळा वर्षीय पीडित मुलीने काही वर्षांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अन्सारीकडून हाेणाऱ्या लैंगिक छळाविषयी तिने चाईल्ड लाईन संस्थेलाही कळवल्याचे सांगितले जाते. मात्र डाॅ. मकसूदने आपला प्रभाव वापरून हे प्रकरण दाबल्याचे बोलल्या जाते. अन्सारी रसायनशास्त्रासह दोन विषयात पीएच. डी. आहे. ३९ व्या वर्षी त्याचे पहिले लग्न झाले. त्याला दोन मुली आहेत. मात्र िवकृतीमुळे पत्नी त्याला साेडून दाेन मुलींना घेऊन निघून गेली हाेती. त्यानंतर ५४ व्या वर्षी त्याने १९ वर्षीय मुलीसोबत दुसरे लग्न केले. सन २०११-१२ मध्ये तिलाही साेडून दिले. नंतर अन्सारीने तीन मुली दत्तक घेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस अाले अाहे.
16 वर्षांपूर्वी घेतले होते मुलींना दत्तक..
- मकसूद अंसारी असे आरोपीचे नाव आहे.
- अारोपी निरी या प्रतिष्ठित संशोधन संस्थेचा सेवानिवृत्त शास्त्रज्ञ आहे.
- आरोपीच्या पहिल्या पत्नीला दोन मुली आहेत. त्या विवाहीत आहेत.
- पहिल्या पत्नीने आरोपीला सोडले त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले.
- दरम्यान आरोपीने पत्नीच्या मदतीने 16 वर्षांपूर्वी अमरावतीच्या एका अनाथाश्रमातून एका मुलीला दत्तक घेतले होते.
- दरम्यान तीनही पीडित मुलींना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
- 16 वर्षांच्या मुलीबरोबर हा नराधम 8 वर्षांपासून दृष्कृत्य करत होता.
- अखेर नराधमाच्या असह्य छळाचा प्रकार मुलीने मैत्रिणींना सांगितला.