आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : नवीन वर्षाच्‍या जल्‍लोषात नागपुरमध्‍ये युवकाची हत्‍या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - गेल्‍या 2015 मध्‍ये गुन्‍हेगारीच्‍या घटनांनी नागपूर चांगलेच हादरले. उपराजधानी असलेल्‍या नागपूरला विरोधकांनी 'क्राईम कॅपिटल' असे नावही दिले. तर, नवीन वर्षाच्‍या स्‍वागताचा जल्‍लोष सुरू असताना एका युवकाचा खून झाल्‍याने पुन्‍हा नागपुरात खळबळ उडाली आहे. धीरज कांबळे असे हत्‍या झालेल्‍या 24 वर्षीय युवकाने नाव आहे. त्‍याचा खून कोणी आणि का केला हे अद्याप स्‍पष्‍ट झाले नसल्‍याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
शहरात होता तगडा बंदोबस्‍त
- नवीन वर्षाच्‍या पूर्वसंध्‍येला नागपुरमध्‍ये सर्वत्र पोलिसांचा तगडा बंदोबस्‍त होता.
- रात्री सुमारे 11 वाजेदरम्‍यान कोतवाली पोलिसांना एक तरूण जखमी अवस्‍थेत आढळला.
- हा तरूण सिरसपेठ येथे पडलेला आहे, अशी माहिती पोलिसांना फोनवरून देण्‍यात आली.
- पोलिसांनी तात्‍काळ घटनास्‍थळ गाठून युवकाला हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल केले.
तीक्ष्ण हत्यारांचे वार
धीरज कांबळे याच्‍यावर हल्‍लेखोरांनी तीक्ष्‍ण हत्‍यारांनी वार केले होते. पोलिसांनी घटनास्‍थळावरून तात्‍काळ त्‍याला हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल केले. मात्र तपासणी दरम्‍यान डॉक्‍टरांनी त्‍याला मृत घोषित केले. धीरजची हत्‍या कोणी आणि का केली याचा तपास पोलिस घेत आहेत.
पुढील स्‍लाइडवर क्‍लिक करून वाचा..,
ड्रंक अँड ड्राईव्‍हच्‍या आरोपाखाली 600 जणांवर कारवाई
मुंबईत तीन बारवर धाडी, 26 मुली, 50 ग्राहक ताब्‍यात
पुणे, नागपूर, ठाण्‍यात मद्यपी वाहनचालकांवर कारवाई
नाकाबंदीमध्‍ये कारमध्‍ये आढळल्‍या बंदुकीच्‍या गोळ्या