आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुंगीचे अाैषध देऊन नागपुरात महिलेवर सामूहिक अत्याचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ३५ वर्षीय महिलेस शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना नागपुरात मंगळवारी रात्री घडली. पोलिसांनी तातडीने शोधमोहिम राबवून सातपैकी सहा नराधमांना अटक केली. ३५ वर्षीय पीडित महिला धरमपेठ परिसराजवळील वसंतराव नाईक झोपडपट्टीत झुणका भाकर केंद्र चालवते. सर्व आरोपी नेहमीच या केंद्रात येत असल्याने तिचा त्यांच्याशी परिचय होता. मंगळवारी रात्री सात जण तिच्या दुकानावर जेवायला आले होते.

जेवण झाल्यावर ते निघून गेले व तासाभराने पुन्हा परत आले. त्या वेळी त्यांनी आपल्यासोबत शीतपेयाची बाटली आणली होती. शीतपेय प्यायल्यावर बेशुद्ध झालेल्या पीडित महिलेस युवकांनी ऑटोने रामनगर परिसरातील एका घरात नेले. तेथे रात्रवर तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले.

पहाटेच्या सुमारास नराधम तेथून निघून गेल्यावर पीडित महिलेने अंबाझरी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गजानन सनेश्वर (वय २०), भुपेश रगडे (वय १९), मयुर नेवारे (वय २२), राहुल तितरमारे (वय २६), अब्दुल रहीम शेख (वय २८) आणि अरविंद कोडापे अशा सहा नराधमांना अटक केली. त्यांचा सातवा साथीदार फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा,
बीड- बलात्कार करून मायलेकीची हत्‍या करणा-या दोघांना मरेपर्यंत शिक्षा
बातम्या आणखी आहेत...