आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DON साठी काम करत कोट्यधीश बनला हा गँगस्टर, लक्झरी कारचा आहे चाहता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- नागपूर पोलिस सध्‍या गॅंगस्टर्सच्‍या मागावर आहे. डॉन आणि त्‍याच्‍या गँगच्‍या सद्स्यांवर मोक्‍का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कायदा) लावून त्‍यांना तुरूंगात टाकण्‍यात येत आहे. या कारवाईच्‍या भितीने काही गुंड शहरातून पसार झाले आहेत. दरम्‍यान नागपूरचा गँगस्‍टर युवराज माथनकर याच्‍याकडे कोट्यवधी रूपयांची संपत्‍ती असल्‍याची माहिती छापेमारीत समोर आली आहे. कोण आहे गँगस्‍टर युवराज...
- युवराज माथनकर नागपूरचा कुख्‍यात गुंड आहे. तो कधीकाळी नागपूरचा डॉन संतोष आंबेकरसोबत काम करत होता.
- अवैध धंद्यांच्‍या जोरावर युवराजने कमी वेळात कोट्यवधी रूपये कमावले आहेत.
- नागपूरच्‍या सोनेगांव पोलिस ठाण्यात त्‍याच्‍यावर 448, 452, 141, 143, 147, 148, 149, 504, 506 (ब) या कलमांखाली गुन्‍हे दाखल आहेत.
- त्‍याच्‍याकडे महागड्या लक्झरी कारही आहेत.
- सुमारे 10 वर्षांपूर्वी युवराज माथनकर एका युवकाच्‍या हत्‍येनंतर चर्चेत आला होता.
- संतोष आंबेकरने त्‍याला आपल्‍या गँगमध्‍ये सामील करून घेतले होते.
- तो आंबेकरचा सर्वात विश्‍वासू सहकारी होता. मात्र तो आपल्‍या पुढे जात असल्‍याचे आंबेकरच्‍या लक्षात आले नि दोघांमध्‍ये फुट पडली.
शहरात ठिकठिकाणी मालमत्ता....
डॉन संतोष आंबेकरसाठी काम करताना युवराजने कोट्यवधी रूपयांची संपत्‍ती कमावली. शहरातील अनेक भागात त्‍याच्‍या मालमत्‍ता आहेत. असे सांगितले जाते की, एकदा युवराज शोरूममधून नवीन कार घेऊन संतोष आंबेकरला दाखवण्‍यासाठी पोहोचला तेव्‍हा त्‍याने त्‍याच्‍या कारला आग लावली होती. या घटनेनंतर दोघांमध्‍ये दरी निर्माण झाली.
कोण आहे संतोष आंबेकर..
संतोष आंबेकरला नागपूरचा कुख्‍यात गुंड म्‍हणून ओळखले जाते. आंबेकर आणि त्‍याच्‍या गँगवर महाराष्ट्र सरकारने मोक्‍का लावला आहे. त्‍याच्‍यावर खून, खंडणी, गँगवारसह कित्‍येक गुन्‍हे दाखल आहेत. तो एकेकाळी नागपूरच्‍या इतवारी रस्त्यावर चहाची दुकान चालवत होता. नागपूरच्‍या गुन्‍हेगारी विश्‍वात तो सर्वात श्रीमंत आहे. त्‍याच्‍या बंगल्‍याची किंमत सुमारे 2 ते 4 कोटी रूपये सांगण्‍यात येते. त्‍याच्‍यावर मोक्‍का लावल्‍यापासून तो फरार आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, गँगस्‍टर युवराजचे फोटो...