आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार पीडितेच्या जिद्दीला सलाम: 4 दिवसांत दु:ख विसरून जिंकली कराटे कॉम्पिटीशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाताना पोलिस - Divya Marathi
पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाताना पोलिस

नागपूर- ती 12 वर्षाची कोवळी कळी. खुलण्याच्या आधीच तिला चुरडण्यात आले. तिच्यावर बलात्कार झाला होता. विशेष म्हणजे कराटे प्लेअर. नॅशनल कॉम्पिटीशनची तयारी करत होती. कॉम्पिटीशन अवघ्या 10 दिवसांवर आली होती. आता सगळं संपलं, ती पुन्हा कशी उशी राहील, असा प्रश्न आई-बाबा आणि तिच्या प्रशिक्षकाला पडला होता. एवढेच नाही तर, पुढील वर्षी तयारी करू, असेही प्रशिक्षकाने तिला सांगितले. पण, तिने हिम्मत सोडली नाही. अवघ्या चार दिवसांत ती दु:ख विसरली. जिद्दीने उभी राहिली. नॅशनल कराटे कॉम्पिटीशन जिंकून आता इंटरनॅशनल कॉम्पिटीशनसाठी साऊथ आफ्रिकेला रवाना झाली आहे.

वाचा...बलात्कार पीडीतेच्या जिद्दीची कहाणी...
- पीडित मुलगी आठवीची‍ विद्यार्थिनी आहे. 20 जुलै 2016 च्या रात्री 9 वाजता ती तिच्या मैत्रिणींसोबत कराटे क्लास करून घरी येत होती.
- रस्त्यात दोन्ही मैत्रिणींचे घर आले आणि त्या घरी निघून गेल्या. मुलीला एक तरूण भेटला. तो तिच्या ओळखीतला होता. तिला तो निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेला. तिथे तिच्यावर बलात्कार केला आणि फरार झाला.
- पोलिसांनी आरोपीला एक दिवसात जेरबंद केले.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, पीडितेने खचवली नाही हिम्मत....10 व्या दिवशी जिंकले कांस्यपदक...

बातम्या आणखी आहेत...