आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल न भरल्याने मृतदेह देण्यास रुग्णालयाचा तीन दिवस नकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- नागपूरजवळील वाडी गावात वेलट्रीट या खासगी रुग्णालयात २८ ऑगस्टपासून उपचार घेत असलेल्या छिंदवाड्याच्या संतकुमार धुर्वेचा सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. डॉक्टरांनी मृताच्या नातेवाइकांना लाख ८२ हजार रुपयांचे बिल दिले. नातेवाइकांकडे एवढे पैसे नव्हते. रुग्णालय व्यवस्थापनाने बिल भरल्यामुळे मृतदेह सोपवण्यास नकार दिला. पैसे नसतील तर किडनी द्या, अशी संतापजनक मागणी त्यांनी केली.

छिंदवाडा जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप केल्यानंतर शुक्रवारी दुपारी मृतदेह साेपवण्यात आला. संतकुमार यांचा मावसभाऊ सुनील धुर्वे यांनी सांगितले की, बिल दिल्याने रुग्णालयाने नातेवाइकांना खोलीत बंद केले.

संतकुमारची पत्नी रामकली धुर्वेने सांगितले की, नातेवाइकांना दूरध्वनी करून पैसे आणण्यास सांगितले. बिल देऊ शकत नसाल तर किडनीची मागणी केली. थोड्याशा शेतीने काहीच होत नाही. मजुरीवर घर चालते. इथे उपचार झाल्याने नागपूरला गेलो. तिथे एवढा खर्च सांगितला नव्हता. आम्ही आतापर्यंत ७० हजार रुपये दिले होते. प्रकरणात रुग्णालयाचे संचालक शैलेष जैन म्हणाले, २८ ऑगस्टपासून उपचार सुरू होते. महागडी औषधी देण्यात आली. आम्ही खर्च केला आहे. बिल तर घेणारच. रुग्णाला दाखल करणारा बेपत्ता झाला.
बातम्या आणखी आहेत...