आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व परवानग्या घेऊनच नागपूर मेट्राेचे काम करू: रणजित पाटील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नागपूर मेट्राे प्रकल्पाची कामे तांत्रिक सल्लागाराने दिलेल्या सूचना अाणि निकषांसह करण्यात अाली अाहेत. या कामाची तपासणी नागपूर येथील व्हीएनअायटी संस्थेमार्फत करण्यात अाली अाहे. त्याचा अहवाल नागपूर महानगरपालिकेला सादर केलेला असून सर्व परवानग्या मिळाल्याशिवाय मेट्राेचे काम केले जाणार नाही, असे अाश्वासन नगरविकास राज्यमंत्री डाॅ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी दिले. यासंदर्भात नागपूर येथे स्थानिक लाेकप्रतिनिधी, अामदार यांची बैठक घेतली जाईल, असेही रणजित पाटील यांनी या वेळी  जाहीर केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधी उपस्थित करून नागपूर मेट्रोच्या  कामाबाबत सभागृहात काही प्रश्न विचारले. यावर उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी नागपूर येथे स्थानिक लाेकप्रतिनिधींसमवेत बैठक घ्यावी, अशी सूचना केली. ही  सूचना पाटील यांनी या वेळी मान्य केली.  त्यावर नागपूरच्या आमदारांनी समाधान व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...