आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर-मुंबई सुपर एक्स्प्रेस वे होणारच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शेतजमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला तरी कोणत्याही परिस्थितीत नागपूर- मुंबई हा नवा सुपर कम्युनिकेशन महामार्ग प्रकल्प पूर्ण होणारच आहे असे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बुधवारी ठणकावून सांगितले. नव्यानेच होणाऱ्या या समृध्दी महामार्गाच्या प्रगती संदर्भात पोटे यांनी बुधवारी पत्र परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी किरण गित्ते आणि अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी उपस्थित होते. या महामार्गाकरिता शेतजमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना पोटे यांनी सांगितले की, मोजके तीन ते चार गावे वगळता उर्वरीत सर्व गावातील शेतकऱ्यांनी प्रकल्पाकरीता शेतजमिनी देण्याची संमती दर्शविली आहे. महामार्गाकरीता अधिसूचना निघाल्याने आता कोणत्याही परिस्थितीत पाऊल मागे पडणार नाही. महामार्गालगतच्या हब करीता शेतजमिनी घेण्यात येणार नाही. रस्त्याकरिता संपादित जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना दिली जाणारी अमरावती जिल्ह्यातील विकसीत जमीन ही शासनाच्याच मालकीची असल्याचे प्रवीण पोटे यांनी या वेळी सांगितले.

राज्यात नव्यानेच होणाऱ्या नागपूर -मुंबई या सुपर एक्स्प्रेस कम्युनिकेशन वे करीता अमरावती जिल्ह्यातील शेतजमीन ताब्यात घेताना शेतकऱ्यांना भूसंपादन आणि भूसंचयन असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. या दोन पैकी भूसंचयन हा पर्याय भविष्यात शेतकऱ्यांना सध्याच्या तुलनेत कित्येक पटीने मोबदला देणारा ठरेल अशी माहिती पोटे यांनी दिली. सुपर एक्स्प्रेस कम्युनिकेशन वे करीता जिल्ह्यातील ८२५ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे संपादन करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...