आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरच्या महापौर पदासाठी भाजपकडून नंदा जिचकार यांची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- नागपूर महापालिकेच्या महापौरपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या नेतृत्त्वात नंदा जिचकार यांची निवड करण्यात आली आहे.  

उपमहापौर पदासाठी दीपराज पारडीकर, स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी संदीप जाधव, संदीप जोशी सत्ता पक्ष नेता म्हणून निवड करण्यात आली आहे. 

मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये महापालिकेच्या कार्यकारिणीबाबत जोरदार रस्सीखेच सुरु होती. आमदार अनिल सोले यांनी महापौरपदासाठी नंदा जिचकर यांच्या नावाची घोषणा केली. याबाबत अधिकृत घोषणा 5 मार्चला होईल. 6 मार्चला सकाळी 10 वाजता नंदा जिचकर महापौरपदाचा पदभार स्विकारतील. 
बातम्या आणखी आहेत...