आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता नजरा निकालाकडे : पुणे, नाशिकसह महापालिकांसाठी अखेरच्या तासांत जोमाने मतदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मुंबई महापालिकेसह राज्याची उपराजधानी नागपूर, आयटी हब पुणे, नाशिक, सोलापूरसह 10 महापालिकांसाठी आज मतदान झाले. राज्यात भाजप-शिवसेना युती सत्तेत असली तरी या महापालिका निवडणुकीत हे दोन्ही मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहे. दुसरीकडे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि अमरावती महापालिका ताब्यात ठेवण्याचे राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हान आहे. यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 
 
पुणे - माजी महापौर चंचला कोदे, उपमहापौर गायकवाड यांनी केली EVM ची पूजा 
पुण्यातील प्रभाग क्रमांक 22 येथे राजकीय पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांनी EVM मशिनची आरतीचे ताट घेऊन साग्रसंगीत पूजा केली. या प्रकाराच्या चौकशीचे आदेश निवडणुक निर्णय अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि माजी महापौर चंचला कोद्रे व उपमहापौर बंडू गायकवाड यांनी मतदान यंत्राची पूजा केली. एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना मतदान यंत्राजवळ कसे जाऊ दिले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
 
3.30 पर्यंतची टक्केवारी
पुणे - 43 %
सोलापूर - 43 %
पिंपरी चिंचवड - 43.80 %
नाशिक - 43.33 %
नागपूर - 40 %
अकोला - 46.30 %
अमरावती - 45 %
 
नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. भाजप प्रवक्त्या शायना एनसी या सायकलवर मतदान केंद्रावर पोहोचल्या आणि मतदान केले. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनीही सकाळी मतदान करुन मतदान करण्याचे आवाहन केले. 
 
 
LIVE UPDATE
- दुपारी 3.30 पर्यंत नाशिक महानगर पालिकेसाठी 43.33% मतदान झाले आहे. 
- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील दुपारी 1.30 पर्यंतची मतदान टक्केवारी. रायगड- 44.58
रत्नागिरी- 38.56
सिंधुदुर्ग- 45.27
नाशिक- 34.33
पुणे- 39.68
सातारा- 42.23
सांगली- 38.28
सोलापूर- 36.81
कोल्हापूर- 43.59
अमरावती- 32.02
गडचिरोली- 44.67
- सोलापूर प्रभाग क्रमांक 10 मधील मतदान केंद्र 24 च्या मतदान यंत्राच्या कंट्रोल मशीनचे बटन कर्मचाऱ्याकडून चुकून बंद झाले. मशिन बदलावी लागली.
दुपारी 1.30 पर्यंत ठाण्यात सर्वाधिक मतदान
– पुणे – 30.38 %
– पिंपरी चिंचवड – 30.86 %
– नाशिक – 30.63 %
– सोलापूर – 32 % 
– ठाणे – 35.11 %
– अकोला – 31.5 % 
 
- सकाळी 11.30 वाजतापर्यंत झालेल्या मतदान टक्केवारीत पिंपरी चिंचवडने आघाडी घेतली आहे. 20.73 टक्के मतदान झाले आहे. 
ठाणे- 19.30%
उल्हासनगर- 12.87%
नाशिक- 18.54%
पुणे- 17.61%
पिंपरी चिंचवड- 20.73%
सोलापूर- 17.00%
अमरावती- 19.58%
अकोला- 19.24%
नागपूर- 16.00%
सरासरी- 17.07% 
- पुण्यात सकाळी 11 पर्यंत 19.5 टक्के मतदान झाले. येथे 162 जागांसाठी 1090 उमेदवार रिंगणात आहेत. 
- अकोला महापालिकेसाठी 11 वाजतापर्यंत 15% मतदान झाले. येथे 80 जागांसाठी 579 उमेदावर रिंगणात आहेत. 2012 मध्ये येथे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील भारिप बहुजन महासंघाने मनपा ताब्यात घेतली होती. 
- पिंपरी-चिंचवडमध्ये 11 वाजेपर्यंत 20.63 टक्के मतदान झाले. 
- या महापालिकेकडे राज्याचे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची येथे एकहाती सत्ता होती. 
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सकाळीच नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. 
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मतदान केले. त्यानंतर त्यांनी जनतेला मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले. गडकरी म्हणाले, ' तुम्हाला हवे असेल त्या पक्षाला, उमेदवाराला मतदान करा. मात्र मतदान करा आणि लोकशाहीला मजूबत करा.'
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी 12 वाजेच्या सुमारास नागपूरमध्ये मतदानासाठी आले. त्यांच्यासोबत आई आणि पत्नी अमृता होत्या. 
-  सकाळी 9.30 पर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान टक्केवारी
रायगड- 10.55, रत्नागिरी- 12.72, सिंधुदुर्ग- 12.29, नाशिक- 7.16, पुणे- 11.03, सातारा- 9.46,
सांगली- 9.03, सोलापूर- 7.97, कोल्हापूर- 11.75, अमरावती- 6.33, गडचिरोली- 9.89. 
- सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...