आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 वर्षीय RJ शुभमचा हार्टअटॅकने मृत्यू, चहाचे दुकान चालवणाऱ्या वडीलांचे आधीच निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर जे शुभमने काल नागपुरकरांना अखेरला अलविदा केला. - Divya Marathi
आर जे शुभमने काल नागपुरकरांना अखेरला अलविदा केला.
नागपूर - ‘आssएssनागपूर मालूम तेरे को, बहोत कुछ आता मेरे को’ हा उत्साहाने खळाळता आवाज आता परत ऐकू येणार नाही. अवघ्या २४ वर्षाचा नागपूरचा रेडिअाे जॅकी (अारजे) शुभम केचे याचे गुरूवारी रेडिअाे कार्यक्रमाचे सादरीकरण करतानाच हृदयविकाराने निधन झाले.
उत्साहाचा खळाळता झरा असलेल्या शुभमच्या अकाली एक्झिटने सर्वांना धक्का बसला आहे. गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान शुभमने छातीत दुखत असल्याची तक्रार आॅफिस गार्डजवळ केली. त्यानंतर तो वॉशरुममध्ये गेला. तेथून परतल्यानंतर दारातच कोसळला.
ऑफिसच्या सहकाऱ्यांनी शुभला हितेश हाॅस्पीटलमध्ये दाखल केले. मात्र गंभीर प्रकृती असल्याने तेथील डाॅक्टरांनी त्याला ‘मेयो’ रुग्णालयात हलविले. मात्र तिथे उपचारादरम्यान शुभमचा मृत्यू झाला.
कमी वयात त्याने झपाट्याने यश मिळवले होते. अल्पावधीत त्याने स्वत:चे स्थान निर्माण केले हाेते. हसत खेळत राहाणाऱ्या शुभमला कोणतेही व्यसन नव्हते, असे त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितले.
वडीलांचा मृत्यू, चहाचे दुकान चालवायचे
नागपुरमधील प्रसिद्ध बर्डी मेनरोडवर असेलल्या आनंद बेकरीच्या एका चोट्याश्या गल्लीत शुभम केचेचे कुटुंब प्रदीर्घ काळापासून भाड्याने राहतात. त्याचे वडील पंचशील चौकात चहाचे दुकान चालवायचे. दोन वर्षाआधी त्यांचे निधन झाले. त्याला एक लहान बहीण आहे. त्याने अकॅडमी ऑफ ब्रॉडकास्टिंगचा कोर्स केला होता. त्याने कार्यक्रमांमध्ये अॅंकरिंग आणि मिमिक्री सुरु केली. त्यातून त्याला खर्च भागवण्यापुरते उत्पन्न मिळायचे. त्यानंतर त्याने कॉमेडी आणि रॅप सॉंग लिहायला सुरवात केली. या दरम्यान त्याला आरजे होण्याची संधी मिळाली.
सोमलवार शाळेचा विद्यार्थी
शुभम केचे खामला सोमलवार शाळेचा विद्यार्थी होती. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने धरमपेठ पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला होता. शाळेतही तो अभ्यासप्रिय विद्यार्थी होता. पण एक्स्ट्रा करिकुलमवर त्याचा जास्त भर असायचा.
नागपुरचा तरुण आवाज हरपला
शुभमचा मृत्यू झाल्याची बातमी अगदी वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्याच्या फेसबुक पेजवर चाहते श्रद्धांजली अर्पण करत आहेत. त्याच्या जाण्याने नागपुरचा एक तरुण आवाज कायमचा पडद्याआड गेला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, रेडियो जॉकी शुभम केचेचे फोटो.... अखेरच्या स्लाईडवर बघा शुभमचा व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...