आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : पेंच अभयारण्यात आढळला वाघाचा मृतदेह, मृत्‍यूचे कारण अस्पष्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - चंद्रपूरमधील सावली वनपरिक्षेत्रात वाघाच्‍या चार बछड्यांच्‍या भूकबळीचा प्रश्‍न ताजा असताना आता नागपूरच्‍या पेंच अभयारण्‍यात एका वाघाचा मृतदेह आढळल्‍याने खळबळ उडाली आहे. या वाघाच्‍या मृत्‍यूचे कारण अद्याप समोर आले नाही.

मृतदेह शवविच्‍छेदनासाठी...
पेंच अभयारण्‍यातील देवलापार बिटमधील ही घटना आहे. या वाघाचा मृतदेह आढळल्‍यानंतर वन्‍यजीवप्रेमींमध्‍ये विविध तर्कवितर्क काढले जात आहेत. वाघाच्‍या मृत्‍यूचे कारण अद्याप स्‍पष्‍ट झाले नसले तरी, मृतदेह शवविच्‍छेदनासाठी पाठवण्‍यात आला आहे.
'त्‍या' बछड्यांची आई बेपत्‍ताच
काही दिवसांपूर्वी चार बछड्यांचा मृत्यू व त्यांना जन्म देणारी वाघीण बेपत्ता झाल्याने अख्खा वन विभाग हादरला. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीबीआयची मदत घेतली जाणार असल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपुरात बोलताना केली होती. चंद्रपूर जिल्ह्यात सावली तालुक्यात नवेगाव बीटमध्ये ही घटना उघडकीस आली होती. चार बछडे जंगलातच मृतावस्थेत आढळून आले, तर एका बछड्याला गंभीर अवस्थेत चंद्रपूर येथील व्हेटर्नरी रुग्णालयात आणण्यात आले होते. आठवडा झाला तरी या बछड्यांच्‍या आईविषयी कोणतीही माहित समोर आली नाही.
पेंच अभयारण्‍याबाबत...
– पेंच राष्ट्रीय उद्यान देशातील मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यांच्या सीमाभागात वसले आहे.
- नागपूरपासून 86 कि.मी. अंतरावरील हे उद्यान आहे.
- 1975 मध्ये या उद्यानाला राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर केले गेले.
- 1999 मध्‍ये या उद्यानाला व्याघ्र प्रकल्पाचा अधिकृत दर्जा देण्यात आला.
- बिबळ्या, अस्वल, सांबर, चितळ, चारसिंगा, निलगाय आदी प्राणी येथे प्रामुख्‍याने आढळतात.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा...,
मोतेवारांचा ताबा आता ओडिशा पोलिसांकडे
नगरमध्‍ये एकाच क्रमांकाच्‍या दोन कार ताब्‍यात, मालक, चालकाविरोधात गुन्‍हा