आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमधील केबल कार अपघात दैवी प्रकोप; कंपनीचा अजब तर्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्ये गोंंडोला केबल कार सेवा संचलित करणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापनाने रविवारी झालेला केबल कार अपघात हा दैवी प्रकोप असल्याचे अजब तर्क मांडले आहे. या अपघातात नागपूरच्या ४ जणांसह ७ जण ठार झाले होते.

कंपनीचे महाव्यवस्थापक रियाज अहमद यांच्या मते, जेव्हा वेगाने वारे वाहू लागतात, तेव्हा आम्ही गोंडोला चालवत नाही. ही प्रणाली सुरक्षा उपाययोजनांनी सुसज्ज आहे. रविवारी जे काही घडले ते दुर्दैवी अाहे आणि तो दैवी प्रकोपाचा परिणाम आहे. या रोपवेचा हा अशा प्रकारचा पहिलाच अपघात आहे.जम्मू काश्मीर सरकार व फ्रान्सच्या एका कंपनीचा हा संयुक्त उपक्रम आहे. 

नागपूरच्या अंड्रसकर कुटुंबातील चौघांवर अंत्यसंस्कार
या अपघातात ठार झालेल्या येथील अंड्रस्कर परिवारातील चौघांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  नवीन सुभेदार ले-आऊट येथील जयंत अंड्रस्कर (वय ४२) हे नोकरीनिमित्त गेल्या आठ वर्षांपासून दिल्ली येथे राहात होते. ते पत्नी मनीषा (वय ३८) व अनघा (वय ०७) आणि जान्हवी (वय ०४) या मुलींसह गुलमर्ग येथे गेले होते. चौघेही अपघातात मृत्यूमुखी पडले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास इंडिगोच्या िवमानाने चौघांचे मृतदेह नागपूर येथे आणले. जयंत यांच्या पत्नी मनीषा वांढरे याही नागपूरच्याच होत्या.जयंत यांच्या पश्चात आई-वडील व भाऊ-वहिनी असा परिवार आहे.
 
- जयंत अंड्रसकर हे त्यांच्या कुटुंबासह गुलमर्गला फिरायला गेले होते. गुलमर्ग आणि गोंडोलादरम्यान पर्यटकांची ने-आण करण्यासाठी केबल कारचा उपयोग केला जातो. याच कारमध्ये नागपुरातील जयंत अंड्रसकर(४२), त्यांची पत्नी मनिषा (४०) तसेच अनघा (५) आणि जान्हवी (७) या दोन मुलींसह त्यांचे गाईड बसले होते. परंतु तेवढ्यात अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला. या वाऱ्यामुळे एक मोठे झाड उन्मळून कारच्या केबलवर पडले अन‌ केबल तुटून कारही दरीत कोसळली. या दुर्दैवी अपघातात अंड्रसकर परिवारासह एकून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यात एक स्थानिक नागरिक मुख्तार अहमद असल्याचेही पोलिसांनी सांगितले. हे वृत्त कळताच काल सायंकाळी त्यांच्या नागपुरातील जुना सुभेदार ले-आऊट परिसरात दु:खाची छाया पसरली.
 
हेही वाचा
बातम्या आणखी आहेत...